प्राथमिक शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व समृध्दी स्पर्धा सन 2024-2025 शासन निर्णय rangotsav inaugration
कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
रंगोत्सव कार्यक्रम 2024 – 25
■ NCERT, MPSP आणि SCERT यांच्या वतीने आयोजन
■ सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षक
■ जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार
रंगोत्सव समृद्धी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासन निर्णय येथे पहा Click Here
■ अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning) याचा शालेय स्तरावर प्रसार व प्रचार व्हावा हा प्रमुख हेतू.
रंगोत्सव कार्यक्रमाचा उद्देश
• अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे,
■ विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे,
■ विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे
रंगोत्सव कार्यक्रम – स्वरूप
• अनुभवात्मक अध्ययन (Experiential Learning) आधारित उत्कृष्ट कृतौ राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे.
■ शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्द्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची लिंक दिलेल्या Google link वर पेस्ट करणे.
रंगोत्सव :- मार्गदर्शक सूचना
• एका शाळेतून एका वेळी एकच संघ सहभागी होऊ शकेल.
■ इयत्ता ३री ते ८वी चे विद्यार्थी सहभागी होतील.
■ एका संघामध्ये ०६ ते ०८ विद्यार्थी व २ शिक्षक (१ पुरुष व १ महिला) यांचा समावेश असेल.
• संघ हा पूर्ण मुलांचा/मुर्तीचा किंवा मुलामुलींचा एकत्र असा असेल.
• मोबाईलवर चित्रण केलेला व्हिडीओ चालेल.
• सादरीकरण कालावधी ५ मिनिटाचा राहील.
रंगोत्सव :- मार्गदर्शक सूचना
■ खालील विषयावर व्हिडीओ पाठविण्यात यावे..
■1. Arts integration.
■II. Sports integration.
■lii. Toy Based Pedagogy.
■Iv. Story Telling
■ या सर्व विषयांनुसार शिक्षकांनी आपल्या कोणत्याही अध्यापन विषयानुसार वर्गात अध्यापन करतांनाचा ५ मिनिटांचा व्हिडीओ व सदर व्हिडीओची गुगल लिंक या लिंक
■https://forms.gle/nPiyWRFzD1sBKpWR8 वर पेस्ट करावी.
रंगोत्सव :- मार्गदर्शक सूचना
■ शिक्षक वर्गात अध्यापन करत असताना सर्व समावेशक अध्ययन अध्यापन कृती, त्याला विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त व शाब्दिक प्रतिसाद आदि बाबींचा समावेश वर्ग अध्यापनात असावा व त्याचे चित्रीकरण करुन व्हिडिओची ड्राईव्ह लिंक पेस्ट करण्यात यावी.
■ सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सदर कार्यक्रमात राज्यस्तरावर सहभाग घेतलेल्या शाळा व संबंधित शिक्षक यांना सहभाग घेता येणार नाही.
• सादरीकरण करण्यात येणाऱ्या व्हिडीओचे या पूर्वी राज्यस्तरावर सादरीकरण झालेले नसावे.
रंगोत्सव :- मार्गदर्शक सूचना
■ व्हिडीओंसंबंधी निकषः
■ व्हिडीओ आडवा मोबाईल धरून शूट केलेला असावा.
■ उपरोक्त पैकी कोणत्याही ही एका विषयावर व्हिडीओशूट केलेला असावा.
■ व्हिडीओचा दर्जा उत्तम असावा.
• व्हिडीओ पाठवतांना सदरील व्हिडिओची google drive लिंक पाठवावी.
■ व्हिडीओ मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेतील असावा.
समृध्दी कार्यक्रम 2024 – 25
■ माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमचाच विस्तारीत कार्यक्रम
■ या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पदधती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते.
■ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-2023) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे.
कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये
• वर्गातील उपक्रम, कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे
• अध्ययन अनुभवांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज र्जाडता येईल.
• अध्ययन अनुभवांमध्ये चिकित्सक विचार व 21 व्या शतकातील कौशल्ये याचाही विचार असावा.
■ अभ्यासक्रमीय ध्येये साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला, कला, खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे.
कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये
सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धर्तीचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र कैरून व वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात.
सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.
कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा.
• वर्गातील विविध अध्ययन अनुभव, कृती व उपक्रमांमध्ये स्थानिक संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.
• कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार आणि शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पनो या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादणूक झाली असली पाहिजे.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रता
■ शासकीय, शासकीय अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते बारावी या इयत्ताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
■ अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटियन शाळा व्यवस्थापन, NCERT, Railways schools, KGBV किवा Cantonment Board Schools सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
• समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव अर्सलो पाहिजे.
रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात विविध स्तरावर केरावयाची कार्यवाही
■ शाळा स्तर –
• रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि.२९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ठीक ६.०० वाजे पर्यंत असेल
• माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले २० मिनिटांचा व्हिडीओ डाईव्ह लिंक व पार्टीचा ५०० शब्दांच्या मर्यादेत प्रकल्प आराखडा दिलेल्या लिंक वर शेअर करणे.
रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात विविध स्तरावर केरावयाची कार्यवाही
• जिल्हा स्तर –
• जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना राज्यस्तरावरून रंगोत्सव व समृद्धी उपक्रमाच्या प्राप्त व्हिडीओ जिल्हानिहाय वर्गीकरण करून पाठविण्यात येतील. जिल्हास्तरावर जिल्हानिहाय प्राप्त व्हिडीओचे आपले अधिकारी यांचे मार्फत अथवा अन्य शिक्षणतज्ज्ञ परीक्षक यांचे मार्फत परीक्षण करून रंगोत्सव कार्यक्रमाचे ०५ उत्कृष्ट अध्ययन कृतींचा व समृद्धी कार्यक्रमाच्या ०३ उत्कृष्ट अध्ययन कृतींचा समावेश असलेल्या व्हिडीओची लिंक आपल्या विभागार्तील RAA / जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवावेत.
रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात विविध स्तरावर केरावयाची कार्यवाही
• विभाग स्तर –
• राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, लातूर, नाशिक, पणे यांना सदरे रंगोत्सव वे समुदधी कार्यक्रमांतर्गत प्राप्त व्हिडीओचे विभागस्तरावर जि.शि. व प्र.सं मधील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्यात यांचे मार्फत किवा आवश्यक असल्यास परीक्षक नियुक्त करून परीक्षण करावयाचे आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून ०३ उत्कष्ट विद्यार्थी व शिक्षक यांचे संघ आणि समृद्धी कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून एक उत्कृष्ट संघ अशी नामनिर्देशने परिषदेतीले कला व क्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल आयडी वर दि. ०३/०१/२०२५ पर्यत पाठवावयाचे आहेत.
रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात विविध स्तरावर केरावयाची कार्यवाही
• राज्यस्तर – राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERTM) येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त २४ उत्तम अध्ययन कृर्तीच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी अमिंत्रित करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर SCERTM येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आठ विभागाकडून प्राप्त ०८ उत्तम अध्ययन कृर्तीच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल.
• रंगोत्सव व समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमचे आयोजन दि. १९ व दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात येईल. रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यतच मर्यादित आहे. तथापि समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना
• समृद्धी कार्यक्रमात दोन शिक्षकांचा एक गट सहभागी होऊ शकतो. यामध्ये एक शिक्षक माध्यमिक स्तरावर इयत्ता ९ वी ते १२ वी या इयत्तांना अध्यापन करणारे असावेत आणि दुसरे शिक्षक दृश्य कला, संगीत, नृत्य, नाट्य शिक्षक यांना अध्यापन करणारे असावेत.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही शाखेतील इयत्ता नववी ते बारावीतील विज्ञान, भाषा, गणित, मानव्यविदया किंवा अन्य अभ्यासक्रमातील अन्य कोणत्याही विषयावर पाठाचा प्रकल्प आराखडा अगोदर सादर करावा लागेल. सदर पाठाचा प्रकल्प आराखडा तयार करताना कोणत्याही ललित कला प्रकारांचा एकात्मिकपणे वापर केला जावा. तसेच सदर प्रकल्प आराखडा कलात्मक अभिव्यक्तीच्या सौंदर्यशास्त्राशीही एकात्म असावा. प्रकल्प आराखडा संदर्भात सोबत जोडलेल्या व NCERT नवी दिल्ली यांच्यावतीने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्यात यावे, सदर मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रकल्प आराखडा संदर्भात नमुना ही दिला आहे त्याचे अवलोकन व्हावे. शिवाय पत्रासोबत तो स्वतंत्र ही जोडला आहे.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना
सदर प्रकल्प आराखडा हा वर्गातील अध्ययन अध्यापन कृती (classroom practice यांच्याशी संबंधित असावा. सदर प्रकल्प आराखडा सादर करताना शाळेचा शिक्का व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र ही सोबत जोडावे.
■ दृश्यकला, संगीत, नृत्य, नाट्य या कलांचाही सादरीकरणांमध्ये एकात्मिक वापर केला जावा.
■ सादरीकरणात माहिती व तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करता येईल.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना
• सदर प्रकल्प आराखड्याचा write up किमान ५०० शब्दांच्या मर्यादेत असावा. सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापन कृतींची संपूर्ण प्रक्रिया व सदर सादरीकरणातील ठळक बाबी अधोरेखित केलेले असाव्यात. तसेच सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापनातील कृर्तीची छायाचित्रे व व्हिडिओच्या ड्राईव्ह लिंक्स सुद्धा नमूद करता येतील. सदर संशोधन आराखडा सादर करतानाइंग्रजी भाषेतील Times New Roman या फॉन्टचा वापर केला जावा. Font size १२ असावी. ६. सदर प्रकल्प आराखड्याचे व सादरीकरणाचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी भाषा असेल. ७. सादरीकरणांमध्ये जे अध्ययन अध्यापन साहित्य वापरले जाणार आहे त्याचा उल्लेख सदर प्रकल्प आराखड्यामध्ये असला पाहिजे.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना
• विद्यार्थी सहभागाचा स्तर सुद्धा स्पष्टपणे नमूद करण्यात यावा.
• राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी वीस मिनिटांचा कालावधी व परीक्षकांशी प्रश्नोत्तरासाठी पाच मिनिटांचा कालावधी असेल असा एकूण २५ मिनिटाचा कालावधी असेल.
• राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास २५००० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या संघास २०००० रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघास १५००० रुपये पुरस्कार स्वरुपात देऊन सन्मानित करण्यात येईल. सदर पुरस्कार रक्कम विजेत्या संघातील दोन्हीं सदस्यास समानतेने विभागून देण्यात येईल. सदर रक्कम विजेत्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
रंगोत्सव व समृध्दी कार्यक्रम फरक
■ रंगोत्सव कार्यक्रमात इयत्ता तिसरी ते आठवीला अध्यापन करणारे शिक्षक सहभाग घेऊ शकतात तर समृद्धी कार्यक्रमात इयत्ता नववी ते बारावीला अध्यापन करणारे शिक्षक सहभाग घेऊ शकतात.
■ रंगोत्सव कार्यक्रमात शिक्षकांना पाच मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर समृद्धी कार्यक्रमात वीस मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
• रंगोत्सव कार्यक्रमात शिक्षकांना फक्त पाचच मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर समृद्धी कार्यक्रमात वीस मिनिटांच्या व्हिडिओ बरोबर 500 शब्दांच्या मर्यादेतील पाठाचा प्रकल्प आराखडा सादर करायचा आहे.
रंगोत्सव व समृध्दी कार्यक्रम फरक
• रंगोत्सव कार्यक्रमात चार विषयापैकी एक विषय निवडून व्हिडिओ बनवायचा आहे. तर समृद्धी कार्यक्रमात केवळ एका विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे.
• राज्यस्तर हा रंगोत्सव कार्यक्रमासाठी अंतिम स्तर असेल मात्र समृद्धी कार्यक्रमांमध्ये जो शिक्षकांचा संघ विजय ठरेल. त्यांना राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.
• राज्यस्तरावर सादरीकरण करणाऱ्या सर्व शिक्षकांना सादरीकरणासाठी पारितोषिके प्रदान करण्यात येईल. यातून कोणतेही क्रमांक काढले जाणार नाही मात्र समृद्धी कार्यक्रमात एक सर्वोत्तम संघ हा राज्यस्तरावर निवडला जाईल व त्या संघाला राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.