राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत rajya vetan samiti
१) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, धंतोली, वर्धा जिल्हा वर्धा- ४४२००१
२) अध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र (राज्यस्तर), परभणी-४३१४०१
३) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना, साईगंगा, लक्ष्मीनारायण नगर, लाडगांव रोड, वैजापूर, जि. औरंगाबाद-४२३७०१
४) अध्यक्ष, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी
५) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन १०२, शर्मा नगर, चितोड रोड, धुळे.
६) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना, पुणे प्लॉट नं. २३, महालक्ष्मी नगर, उजळाई वाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
७) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, वित्त विभाग, जिल्हा परिषद, पुणे
८) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, मु. सायगाव, पो. एकंबे,
ता. कोरेगाव, जि. सातारा-४१५५०१
विषयः- राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या
प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत संदर्भ:- वित्त विभागाकडील दि.१४.०६.२०२४ रोजीचे पत्र (प्रत संलग्न)
उक्त संदर्भाधीन पत्रान्वये राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या
महोदय,
प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी
संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारीत वेळापत्रक देण्यात आले आहे. सदर पत्रात ग्राम विकास
विभागाकरीता दि.०२.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० अशी वेळ देण्यात आली आहे. २. उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दि.०२.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वाजता मंत्रालय, विस्तार इमारत, २ रा मजला, दालन क्र. २४१, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई-४०००३२ येथे (तसेच सादरीकरण करावयाचे असल्यास आगाऊ कळविण्यात यावे) बैठकीस जास्तीत जास्त ४ प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, ही विनंती.