आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मराठी भाषण rajrshi shahu Maharaj jayanti
शिवछत्रपतींचे वारसदार राजर्षी शाहू महाराजांनी आजचा प्रगतिशील महाराष्ट्र घडवला. रयतेचा राजा असणारा हा राजपुरुष राजेशाही न मिरवता रयतेच्या कल्याणासाठी सतत झटत होता.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जुन 1874 साली झाला.
एप्रिल १८९४ रोजी शाहू छत्रपती झाले. कोल्हापूरच्या प्रजाजनांना लोककल्याणकारी राजा मिळाला. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या कोल्हापुरात शिवछत्रपतींना वंशज मिळाला. राज्यारोहणप्रसंगी शाहू महाराजांनी आपल्या प्रजेला उद्देशून एक जाहीरनामा काढला. ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींच्या आज्ञापत्राने आम्ही शिवछत्रपतींचे वारसदार आहोत. आमच्या पाठीशी सदैव त्यांची पुण्याई आहे. त्यांच्या वारसा, त्यांचे संस्कार आम्हाला जतन करावयाचे आहेत. रयतेचे सुख हेच हिंदवी स्वराज्याचे अंतिम ध्येय आहे’ असे या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटले.
रयतेचे कल्याण हेच त्यांच्या कारभाराचे मुख्य उद्दिष्ट होते, रंजल्या गांजल्या गरीब अज्ञानी प्रजेसाठी कार्य केले. १८९६-९७ मध्ये देशात मोठा दुष्काळ पडला. शाहूराजांनी अविश्रांत नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे दुष्काळावर मात केली. निराधार आश्रमाची उभारणी करून पन्नास हजार निराधारांना अन्न वस्त्र निवारा देऊन जीवनदान दिले. रोजगार हमी योजना शाहूंनी सर्वप्रथम राबविली. त्यांचा राज्यकारभार हा प्रजाहितदक्ष होता. त्यांनी प्रशासक मंडळ स्थापन करून राज्य कारभारावर करडी नजर ठेवली. ते कुशल प्रशासक होते.
भारतात शेकडो वर्षे बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित होता. अशा बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. शिक्षणासाठी कोल्हापुरात येणाऱ्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी केली. त्यांनी सामाजिक स्वरूपाचे निर्णय समाजस्थितीचा पूर्ण अभ्यास करूनच घेतले. अस्पृश्यांसाठी शिक्षणाची कवाडे शाहू महाराजांनी सताड उघडी केली. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी आपल्या तंत्राने केला. सर्वांसाठी आपल्या संस्थानात मोफत शिक्षणाचा कायदा करणारे शाहू महाराज हे देशातील पहिले राजे होते. शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय शाहू महाराजांनी घेतले. अस्पृश्यांना धार्मिक शिक्षण देऊन त्यांनी क्रांती केली. अस्पृश्यतेचे कायदेशीर उच्चाटन व्हायला देशाला स्वातंत्र्य मिळावे लागले. शाहू महाराजांनी आपल्या लोकोत्तर कार्याने स्वातंत्र्याच्या पस्तीस वर्षे अगोदरच आपल्या छोट्या कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन केले. मागासवर्गीयांना सर्वच क्षेत्रांत आरक्षण देऊन सामाजिक क्रांती घडवून आणणारे शाहू महाराज हे पहिलेच शासनकर्ते होते.
शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. दोषविरहित हिंदू समाज उभारणीसाठी त्यांनी आपले आयुष्य सत्कारणी लावले. जातिव्यवस्थेची उतरंड मोडली पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत. अस्पृश्यता हे जातीभेदाचे किळसवाणे स्वरूप आहे, असे त्यांचे आग्रही मत होते. रोटी-बेटी व्यवहारबंदी, व्यवसाय बंदी असे निर्बंध जातिव्यवस्थेत रूढ होते. ही सर्व बंधने त्यांनी समाजव्यवस्थेला झुगारून देण्यास भाग पाडले. आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अशा विवाहाचा पुरस्कार केला. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. घटस्फोट कायदा, वारसा हक्क, पोटगी हक्क, देवदासी प्रतिबंधक कायदा, महार वतने खालसा, वेठबिगार कायदा, सतीच्या शिक्षणाचा कायदा असे कायदे करून आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. स्त्रियांच्या सामाजिक रक्षणाचे कायदे केले.
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शेतीला उद्योगधंद्याचा दर्जा दिला. शेतीसाठी मूलभूत सुधारणा केल्या. शेतीला पूरक नवीन उद्योग धंदे सुरू केले. उद्योगधंद्याला सहकाराची जोड दिली. सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर केले. पाटबंधारे खाते करून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. राधानगरी धरण प्रकल्पाचा त्यांनी ध्यास घेतला आणि धरण प्रकल्प बांधून पूर्ण केला. गावागावांतून शेतकी प्रदर्शने भरविली. व्यापार उद्योगाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूर नगरीचा लौकिक वाढला. गुळाची बाजारपेठ निर्माण केली. औद्योगिक प्रदर्शने, आयोजित करून औद्योगिकीकरणाचा पाया रचला. कापड गिरणी उभारून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध केला. ऑइल मिल, फॅक्टरी, इलेक्ट्रिक कंपनी, मोटार ट्रान्स्पोर्ट कंपनी आणि इतर उद्योग सुरू केले.
शिक्षणाची कवाडे शाहू महाराजांनी सताड उघडी केली. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी आपल्या तंत्राने केला. सर्वांसाठी आपल्या संस्थानात मोफत शिक्षणाचा कायदा करणारे शाहू महाराज हे देशातील पहिले राजे होते. शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय शाहू महाराजांनी घेतले. अस्पृश्यांना धार्मिक शिक्षण देऊन त्यांनी क्रांती केली. अस्पृश्यतेचे कायदेशीर उच्चाटन व्हायला देशाला स्वातंत्र्य मिळावे लागले. शाहू महाराजांनी आपल्या लोकोत्तर कार्याने स्वातंत्र्याच्या पस्तीस वर्षे अगोदरच आपल्या छोट्या कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन केले. मागासवर्गीयांना सर्वच क्षेत्रांत आरक्षण देऊन सामाजिक क्रांती घडवून आणणारे शाहू महाराज हे पहिलेच शासनकर्ते होते.
शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. दोषविरहित हिंदू समाज उभारणीसाठी त्यांनी आपले आयुष्य सत्कारणी लावले. जातिव्यवस्थेची उतरंड मोडली पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत. अस्पृश्यता हे जातीभेदाचे किळसवाणे स्वरूप आहे, असे त्यांचे आग्रही मत होते. रोटी-बेटी व्यवहारबंदी, व्यवसाय बंदी असे निर्बंध जातिव्यवस्थेत रूढ होते. ही सर्व बंधने त्यांनी समाजव्यवस्थेला झुगारून देण्यास भाग पाडले. आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अशा विवाहाचा पुरस्कार केला. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर
शाहू महाराजांनी कोल्हापुरात मल्लविद्येचे पुनरुज्जीवन केले. स्वतः शाहू महाराज पट्टीचे मल्ल होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहू खासबाग मैदान हा कुस्तीचा आखाडा बांधला. कुस्तीला राष्ट्रीय स्तराचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या प्रेरणेने अनेक नामवंत नाटक कंपन्या कोल्हापुरात उभ्या राहिल्या. पॅलेस थिएटर म्हणजेच केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी केली. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मल्लविद्या, संगीत, गायनकला, नाट्य, चित्रपट, चित्रकला आदी कलांचे कोल्हापूर हे खास आकर्षण केंद्र झाले. कोल्हापूर संस्थानचा विकास साधण्यासाठी त्यांनी भारताच्या सर्वच प्रांतातून त्याच बरोबर युरोप, जपान, देशातून प्रवास केला. या प्रवासात जे काही नाविन्यपूर्ण दिसले ते त्यांनी संस्थानात निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या कार्याची प्रशंसा केली. राष्ट्र निर्माण प्रक्रियेत शाहू महाराजांचे प्रचंड मोठे योगदान आहे. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला आणि मृत्यू ६ मे १९२२ साली झाला. समरसतेचे ते मानदंड होते.