राजमाता जिजाऊ मराठी भाषण पीडीएफ -2023 rajmata jijau marathi bhashan PDF -2023
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी भाषण आपण या ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषण कसे करायचे हे शिकणार आहोत
स्वराज्याचे स्वप्न बघणारे आणि फक्त बघणाऱ्याच नाहीतर ते सत्यात उतरवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस होय
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची स्वप्न बघितले आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं.
12 जानेवारी हा दिवस अख्या महाराष्ट्राला लाभलेला सोनेरी क्षण होय या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती असते राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना व त्यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करणारे अनेक शिवभक्त असतात.
राजमाता राष्ट्रमाता मासाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शाळा महाविद्यालय कार्यालय देशपातळीवर भाषणे घेतली जात असतात म्हणून अनेक विद्यार्थी राजमाता जिजाऊ यांची जयंती मराठी भाषण याची तयारी करत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज लेखन मध्ये आम्ही राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भाषण घेऊन आलेलो आहोत चला तर भाषण कसे करायचे आणि मासाहेब जिजाऊंचे यांचे विचार कसे मांडायचे ते आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग आणि प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो हा सर्वांना माझा मानाचा जय शिवराय मुजरा जय शिवराय.
आज स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे जमलेले आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला काही विचार सांगणार आहे ते विचार तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.
राजमाता स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही आज आपल्याला त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाही तर ते सत्यात देखील उतरवून दाखवले पण आपल्याला लक्षात येतो.
अशा या शूर महापराक्रमी जिजामाता यांचा जन्म जानेवारी १२ विशेषण १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला सिंदखेडचे लखोजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव माळसाबाई होते जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
शहाजीराजे भोसले हे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होते जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह डिसेंबर इसवी सन १६०५ मध्ये झाला.
निजामशाही आदिलशहा यांनी मुघलांच्या सततच्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय भीषण होती त्याच्या त्यांच्या विरुद्ध एक शब्द काढायची हिंमत कोणामध्ये नव्हती या जुनी सत्तेच्या बंधनातून रयतेची सुटका करावी असे जिजामातांना नेहमी वाटायचे अशा बिकट परिस्थितीत स्वराज्य निर्मितीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.
19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपल्या पतीचे स्वराज्य स्वप्नात यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरलं नुसतं पेरलं नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी सुसंस्काराच्या अमृत सिंचनाने ते फुलवलं फुलवून त्याला वाढवलं त्याला दृष् लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं त्याला नवनवीन.
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञानाच्या व चरित्र संघटना व पराक्रम अशा राजस व साधनांचे बाळकडू पाडले प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यत असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी राजमाता जिजाऊंची शिकवण शिवरायांना दिली होती.
छत्रपती शिवाजीराजे चौदा वर्षाचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली त्यात जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली होती कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले व उध्वस्त झालेले पुणे दिमाकांत बसून त्याला नावलौकिक प्राप्त करून दिला जिजाऊंनी जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारामुळेच शिवाजीराजे घडले जिजाऊंनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाही तर शिवरायांना राजकारणाचे धडे हे दिल.
राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षाचे गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
स्वराज्याचा कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या जीव धोक्यात घालावा लागला पुत्राचा दररोज मृत्यूची चाललेला संघर्ष उघड्या डोळ्यांनी बघूनही सर बाहेर न होता व चिंतेची साधी वेगळी चेहऱ्यावर उमटून न देता त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगराणी केली.
एवढेच नव्हे तर राजमाता जिजाऊ यांची झाल्यावर निवृत्त सारखं न बसता नातू शंभूराजांच्या मनातही अंतकरणाची पेरणी करून स्वाभिमान स्वाभिमानाचा स्त्रीलिंग चेतवलं तीन पिढ्यांना स्वराज्याच्या अभ्यासाने प्रेरित करणारी अशा राजमाता होत्या.
राजमाता जिजाऊ म्हटले की पुरे नुसता राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूक जिजाऊ शब्द येतो आणि राजमाता आणि जिजाऊ हे शब्द म्हणजे जणू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असे वाटते स्वराज्य निर्माता या राजमातेला आज त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मनाचे त्रिवार अभिवादन.