राजमाता जिजाऊ मराठी भाषण 2024 Rajmata jijau marathi bhashan-2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता जिजाऊ मराठी भाषण 2024 Rajmata jijau marathi bhashan-2024

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक, सूत्रसंचालक तसेच, उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग यांना मी नमस्कार करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते.

राजमाता जिजाऊ  यांचा विषय या व्यासपीठाला मिळणं हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे मला राजमाता जिजाऊ यांचाबद्दल बोलण्याची संधी मिळतेय.

मित्रहो, राजमाता जिजाऊ  यांच्याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे कधीच होऊ शकत नाही.

ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ.

भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले, माँसाहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.

“मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडविले शुर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!”

जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता.

त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती.

या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले.

आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती. या मुघल सत्तेतील जे अमानुष लोक होते ते आपल्या आया- बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते.

कोण थांबवणार त्यांना ? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर त्यावेळची परिस्थिती होती.

परंतु, यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करताना दहा वेळा विचार करायला हवा असे काही तरी केले पाहिजे.

हा विचार आपल्या उराशी आपल्या (Rajmata Jijau) राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केला.

19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले, शिवबाच्या जन्मामुळे माँसाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

आपला पुत्र शिवबा, आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य

कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते, स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते.

त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उत्तरविले.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच, अनेक पुराणांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झालेली आहे.

ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे, तेव्हा तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे. हे वाक्य जर आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यात काही वावगं ठरणार नाही.

आपल्या महाराष्ट्रातील मोठ- मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते जिजाऊ माँसाहेबांनी करून दाखविले. शिवबाच्या जन्माच्या अगोदरच माँसाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते.

शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण घेतला.

राजमाता जिजाऊंचा हा अप्रतिम जीवन प्रवास

येण केण प्रकारेण स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी राजांनी ठरविले.

कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते. परंतु माँसाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही.

स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या.

तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिकवल्या

फिरण्याची आणि व्यायामाची.

परंतू, आजची आई स्वतःच्या मुलांना मोबाईल देऊन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते आहे.

यांमुळे, आजची मुलं ही खूप हट्टी आणि आळशी बनत आहेत. मात्र, ही गोष्ट त्यांच्या मातेंच्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कुणीही यात कोणताही बदल घडवून आणू शकत नाही.

अशा या महान जिजाऊ माँसाहेबांबद्दल आपण कितीही बोलले तरी कमीच आहे.

समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिले तरी तेदेखील कमी पडेल, अशी जिजाऊ माँसाहेबांची कीर्ती आहे.

खरंतर, जिजाऊच्या लग्नाआधी त्यांना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांच्या राजनीतीत आणि युद्धकलेत प्रावीण्य मिळवले होते .

आणि याचाच उपयोग त्यांना पुढे त्यांच्या लग्नानंतर शिवबा जन्मल्यावर, शिवरायांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि अमूल्य असे संस्कार देण्यासाठी झाला.

मित्रांनो, प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजींना जन्माला घातले. खरंतर, शिवबाच्या जन्माआधी जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते.

शेवटी एकटे शिवाजी महाराज जगले. खरंतर, या प्रसंगातून एखादी दुसरी माता जर गेली असती तर तिने आपल्या पुत्राला कधीच अशा जीवघेण्या कार्यासाठी सज्ज केले नसते.

उलट त्या मातेने आपल्या पुत्राचे खूप लाड केले असते, त्याचे सर्व हट्ट पुरवले असते. पण, माझ्या राजमाता जिजाऊने मात्र आपल्या प्राणप्रिय असलेल्या शिवबा पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले.

त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे आणि जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा तुळजाभवानीला केलेल्या प्रार्थनेनुसार त्यांनी शिवबांना घडवायला सुरुवात देखील केली.

जेव्हा पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे 14 वर्षांचे होते. तरीदेखील, लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या.

तेव्हा पुण्याची अवस्था ही अतिशय भीषण होती. त्यामुळे, पुण्यात येताच राजमाता जिजाऊंनी आपला पदर कंबरेत खोवला आणि पुण्याचे काम हाती घेतले.

शिवाजी राजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म यांसारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असतं.

खरंतर, न्यायनिवाडा करण्याचे धडे हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेकडूनच प्राप्त झाले. अशा पद्धतीने, राजमाता जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या खरंतर आद्यगुरूच होत्या.

याशिवाय, शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच त्यांचा निर्मळ उद्देश होता.

शिवाजी महाराज ज्यावेळी आग्ग्रात कैद होते, तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे ही जिजाऊ मातेंच्या हाती होती.

अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा

सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष 1674 मध्ये आपला देह ठेवला.

मित्रांनो, अशा जिजाऊंमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. मित्रांनो, ज्यावेळी शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यात अडकले होते.

तेव्हा राजमाता जिजाऊ या स्वतः पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी युद्धावर निघाल्या होत्या;

पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता दिसून येते तसेच, विलक्षण आवेश गोष्टी देखील दिसून येतात.

इ. स. 1664 साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते, हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले.

जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते.

त्या खूप मोठ्या कर्तबगार होत्या. शहाजी राजेंनी सर्व राज्यकारभार हा राजमाता जिजाऊंच्या हाती स्वाधीन केला होता.

राजमाता जिजाऊंवर एक काव्य असे लिहिले आहे जे आपल्या राजमातेबद्दल उल्लेखनीय वर्णन करते.

ते म्हणजे, ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न!

उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती

जिजाऊची स्वप्ने वेडी, तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!’

आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्णदिन दाखवणाऱ्या, महान स्वराज्य संप्रेरिका माँसाहेब राजमाता जिजाऊंना मी शतशः नमन करते आणि माझे दोन शब्द इथच संपवते. धन्यवाद!

जय जिजाऊ ! जय शिवराय!माता

जिजाऊ यांची माहिती, राजमाता जिजाऊ यांची माहिती

मराठी, राजमाता जिजाऊ यांची माहिती दाखवा, राजमाता

जिजाऊ यांच्या बद्दल माहिती, राजमाता जिजाऊ यांच्या

विषयी माहिती, राजमाता जिजाऊ यांच्या विषयी

माहिती दाखवा, राजमाता जिजाऊ भाषण, राजमाता

जिजाऊ भाषण मराठी, राजमाता जिजाऊ भाषण

दाखवा, राजमाता जिजाऊ भाषण हिंदी, राजमाता

जिजाऊ भाषण मराठी, राजमाता जिजाऊ निबंध

मराठी, राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी, राजमाता

जिजाऊ निबंध मराठी, राजमाता जिजाऊ निबंध इन

मराठी, राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी

 

 

Leave a Comment