ॲपचे जमेना, शिक्षकांना ‘पीएफ’चा हिशेब कळेना:जिल्ह्यातील साडेसात हजार शिक्षकांचा जीव टांगणीला provisional fund hishob
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्व व्यवहार ऑनलाइन केल्याचा डंका पिटणाऱ्या शिक्षण विभागात शिक्षकांच्या ‘भविष्य निर्वाह निधी’चे कामकाज मात्र अद्यापही ऑफलाइन पद्धतीनेच सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांच्या खात्यातून भविष्य निर्वाह निधीसाठी (प्रॉव्हिडंट फंड) प्रत्येक महिन्याला पैसे कपात होतात. मात्र, त्याची स्लिप (पावती) मिळत नसल्याने ते किती जमा झाले, हेच शिक्षकांना कळत नसल्याने जिल्ह्यातील साडेसात हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा जीव टांगणीला लागला आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून भविष्य निर्वाह निधीच्या स्लिप दिलेल्या नाहीत. शिक्षकांच्या प्रॉव्हिडंट फंडासाठी शिक्षण विभागाकडून नवे अॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या अॅपमध्ये त्रुटी असल्याने ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. परिणामी, शिक्षकांना ‘पीएफ’ची रक्कमच कळत राज्यभरातील चित्र आहे. नसल्याचे पे-युनिट कार्यालयातून शिक्षकांचे वेतन, भविष्य निर्वाह निधीच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. येथे माध्यमिक शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची साडेसात हजार खाती आहेत. प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यातून भविष्य निर्वाह निधीसाठीच्या पैशांची कपात केली जाते. नेमके किती पैसे आपल्या प्रॉव्हिडंट फंडात जमा झाले, याची वर्षभराची एकत्रित माहिती या कार्यालयाकडून स्लिपद्वारे दिली जाते. मात्र, २०२१ नंतर साडेसात हजार शिक्षकांना या स्लिप दिलेल्या नाहीत.
‘आर्थिक देवघेव’
शिक्षकांना निवृत्त झाल्यानंतर किंवा मध्येच फंडातील रक्कम काढायची असल्यास प्रॉव्हिडंट फंडाची स्लिप गरजेची असते. वर्षभराची एकत्रित स्लिप घेताना अनेकदा ‘आर्थिक देवघेव शिवाय काम पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक वर्षी नियमित या स्लिप दिल्या तर शिक्षकांना सोयीचे होईल, शिवाय यात पारदर्शकताही राहील, अशा भावना शिक्षक व्यक्त करीत आहेत.
भविष्य निर्वाह निधीच्या अॅपची समस्या संपूर्ण राज्यातील आहे. आपल्या कार्यालयातून कोणत्याही शिक्षकाला स्लिप देण्यासाठी कोणतीही अडवणूक होत नाही. – प्रवीणकुमार फाटक, अधीक्षक, पे- युनिट कार्यालय, माध्य. शिक्षण विभाग
त्रुटी कधी दूर होणार? शिक्षण विभागाने प्रॉव्हिडंट फंडाचे
कामकाज ऑनलाइन करण्यासाठी नवीन अॅप विकसित केले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून हे अॅप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यात वारंवार त्रुटी आढळत आहेत. प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम ऑनलाइन कळेल, असे सांगितले जात असताना दुसरीकडे स्लिपही दिल्या नसल्याने नेमकी किती रक्कम जमा झाली, हेच शिक्षकांना कळत नाही.