प्रकल्प कोणत्या इयत्तेचे घ्यावेत ? कोणत्या इयत्तेसाठी कोणते प्रकल्प घ्यावेत ? आणि प्रकल्प कसे घ्यावेत ? project list for class
१. शिक्षकांनी ज्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले, त्याच दिवशी दैनिक टाचणात ‘ प्रकल्पाचे मूल्यमापन’ असा उल्लेख करावा. (जसे – हजेरी क्र…… ते….. च्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प तपासले.)
२. इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीसाठी विद्यार्थ्यांने केलेले काम आणि स्वानुभव कथन (थोडक्यात तोंडी माहिती) यांचा विचार करून एकत्रित गुण दयावेत.
प्रकल्प
३. इयत्ता तिसरी व चौथीसाठी विद्यार्थ्याने केलेला प्रकल्प, माहिती आणि स्वानुभव कथन यांचा विचार करून गुणदान करावे.
४. इयत्ता पाचवी ते आठवीसाठी प्रकल्प माहिती, प्रकल्पातील सहभाग, माहितीचे संकलन, मांडणी, अनुभव कथन या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणदान करावे.