मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती कोणत्या असतात? Presiding officer responsibility
1. मतदार
2. मतदान अधिकारी
3. प्रत्येक उमेदवार, त्याचा निवडणुक प्रतिनिधी (एकावेळी एकच प्रतिनिधी आत मध्ये उपस्थित राहू शकेल)
4. निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले व्यक्ती
5. कर्तव्यर्थ लोकसेवक
6. मतदारासोबत असलेले लहान मुल
7. जे मदतीशिवाय चालू शकत नाहीत व मतदान करु शकत नाही, अशा अंध अपंग मतदारासोबतच्या व्यक्ती.
8. मतदान केंद्राध्यक्ष मतदारांची ओळख पटवण्याच्या मतदान घेण्यास त्यास सहाय्य करण्याच्या प्रयोजनार्थ अशा इतर व्यक्ती
मतदान केंद्रात प्रवेश पात्र व्यक्ती
9. मतदान केंद्राध्यक्ष त्याला आवश्यकता भासल्यास उमेदवाराचे छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची मागणी करेल.
10. मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींकडून ओळखपत्र तसेच त्यांच्या नियुक्तीपत्राची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी साक्षांकीत केलेली दुय्यम प्रत घेईल.
11. उमेदवारासोबत अथवा मतदान प्रतिनिधीसोबत असलेल्या सुरक्षारक्षकास मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही. फक्त Z+ सुरक्षा असलेल्या व्यक्तीसोबत असलेला सुरक्षारक्षक साध्या पोशाखात व शस्त्र दिसणार नाही, अशा रितीने प्रवेश करु शकेल.
12. मतदान केंद्रास भेट देणारे निरिक्षक, क्षेत्रीय अधिकारी, सुक्ष्म निरिक्षक, उमेदवार, RO, ARO, DEO यांनी भेटपुस्तिकेमध्ये (Visit Sheet) नोंद घ्यावी