केंद्राध्यक्ष उतरले प्रचारात, कार्यवाहीचे निघाले आदेश presiding officer on election duty
लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : कळंब येथील एका प्राध्यापकास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळालेली असतानाही ते राजकीय पक्षाच्या प्रचारात उतरले आहेत. संबंधित प्राध्यापकांनी कामातून वगळण्याची केलेली विनंती अमान्य करीत त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश आचारसंहिता कक्ष प्रमुख विलास जाधव यांनी काढले आहेत.
कळंबच्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाने मतदान केंद्राध्यक्ष म्हणून धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या केंद्रावर नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान, नियुक्तीचे आदेश मिळाल्यानंतर संबंधित प्राध्यापकांनी आपण एका राजकीय पक्षाचे सक्रिय सदस्य आहोत. तसेच पक्षाच्या उमेदवारासाठी प्रमुख वक्ता म्हणून जिल्हाभर प्रचार करीत आहोत. या कारणास्तव निवडणूक कामात पारदर्शकता न राहता
अधिनियम काय सांगतो…
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १२९च्या पोटकलम १ व २ मधील उपबंधात या कृत्याविषयीचे विवेचन आहे. त्यानुसार मतदान केंद्राध्यक्षांना निवडणुकीशी संबंधित उमेदवाराशी संबंधित कोणतेही काम, निवडणूक-मतदानावर अनुकूल परिणाम होईल, अशी कृती करता येणार नाही.
तसे केल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्हीही, अशी शिक्षा होऊ शकते, असे अधिनिय- मातील पोटकलम सांगतात.
आदर्श आचारसंहितेचा भंग होईल. त्यामुळे निवडणूक कामातून आपणास वगळण्यात यावे, अशी विनंती संबंधित मतदान केंद्राध्यक्षांनी निवडणूक विभागाकडे केली होती. दरम्यान, त्यांची ही विनंती अमान्य करीत लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करून अहवाल देण्याचे निर्देश आचारसंहिता कक्ष प्रमुख विलास जाधव यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.