प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पद व वेतनश्रेणीबाबत तक्रार अर्ज prathmik padvidhar vetanshreni

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पद व वेतनश्रेणीबाबत तक्रार अर्ज prathmik padvidhar vetanshreni

जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे पवित्र पोर्टल मार्फत २०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पद व वेतनश्रेणीबाबत तक्रार अर्ज

संदर्भ :- १) प्रतिनिधी, पदवीधर शिक्षक व इतर, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे पत्र दिनांक ४-५-२०२३ व त्यासोबतची सहपत्रे

२) राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा, सिंधुदुर्ग यांचे पत्र दिनांक ०८-५-२०२३ व २९- ५-२०२३

३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे पत्र क्रमांक सिंजिप/शिक्षण / प्राथ/आ-२/१०७६/२०२३, दिनांक २०-६-२०२३

महोदय,

जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे ११-०९-२०१९ रोजी एकूण ७६ उमेदवारांचे शिक्षण सेवक पदावरील नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी निर्गमित केली आहे.

२. सदरहू शिक्षण सेवकानी तीन वर्षे सेवा समाधानकारक पूर्ण केल्याने, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

यांनी त्यांची दिनांक २७-३-२०२३ च्या आदेशान्वये तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केल्याचे आदेश निर्गमित केले

आहेत. परंतू त्या आदेशात सदरहू शिक्षणसेवकांना निश्चितपणे कोणत्या पदावर नियुक्ती देण्यात येत आहे.

याचा उल्लेख केल्याचे दिसून येत नाही.

३. त्यामुळे उपरोक्त शिक्षकांपैकी पात्र शिक्षकांच्या दिनांक २७-३-२०२३ च्या आदेशात सुधारणा करुन त्यांच्यासमोर ” प्राथमिक पदवीधर शिक्षक (गणित/विज्ञान) “असे पदनाम नमूद करुन सुधारित आदेश निर्गमित करण्यात यावेत.

४. जिल्हा परिषद, सिधुदुर्ग येथे पदवीधर प्राथमिक शिक्षकांची एकूण ९८० पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीमध्ये विज्ञान / गणित, भाषा आणि समाजशास्त्र विषय संवर्ग निहाय एकूण ५८२ पदे कार्यरत आहेत.

५. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक वेतन-१२१६/प्र.क्र.१२३/१६/टिएनटी- ३. दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ मधील परि.क्र. ३ मध्ये” इयत्ता ६ वी ते ८ वी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी १/३ शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी. या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या ३ पेक्षा अधिक असल्यास पदवीधर वेतनश्रेणी अनुज्ञेय असणाऱ्या शिक्षकांची संख्या त्या प्रमाणात एकापेक्षा अधिक असेल. अशा प्रकारे शिक्षकांची संख्या अधिक असल्यास संबंधित विषय समूहातील सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी समप्रमाणात देय राहील. अशा प्रकारे एखादया संस्थेमध्ये ३ शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देय ठरत असल्यास प्रत्येक विषय समूहातील प्रत्येकी एका शिक्षकांला पदवीधर वेतनश्रेणी मिळेल.” अशी तरतूद आहे.

६. उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथील पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या ९८० पदांपैकी १/३ म्हणजे ३२७ पदवीधर प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी अनुज्ञेय होते आणि ३२७ पैकी प्रत्येकी १/३ म्हणजे, विज्ञान / गणित १०९ पदे, भांषा १०९ पदे, समाजशास्त्र- १०९ पदे अशा प्रमाणात विषयसंवर्गनिहाय प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी (एस-१४) देय होत आहे.

19. सद्यःस्थितीमध्ये जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे विज्ञान / गणित विषयातील, भाषा विषय समूह आणि समाजशास्त्र विषयातील एकूण ५८२ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना प्राथमिक पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी (एस-१४) मिळत आहे. सदर बाब शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक वेतन- १२१६/प्र.क्र.१२३/१६/टिएनटी-३, दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ मधील तरतूदींचा भंग करणारी आहे. तरी

सदर तरतूदीचा भंग करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांचेविरुध्द शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात यावी.

८. तसेच जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक वेतन-१२१६/प्र.क्र.१२३/१६/टिएनटी-३, दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ मधील तरतुदीनुसार विज्ञान /गणित विषयसमूहातील १०९ पदे, भाषा विषयसमूहातील १०९ पदे, समाजशास्त्र विषयसमूहातील १०९ पदे या प्रमाणात विषयसमूहानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पात्र पदवीधर प्राथमिक शिक्षकांना (विज्ञान / गणित विषयसमूहातील उपरोक्त ७६ पदवीधर प्राथमिक शिक्षकांपैकी पात्र शिक्षकांना), प्राथमिक पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी (एस-१४) मंजूर करावी.

९. उपरोक्त प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल एक महिन्यात शासनास सादर करावा, ही विनंती.

Join Now

Leave a Comment