पोस्टल मतदान करताना होणाऱ्या चुका कशा टाळल्या पाहिजेत म्हणजे आपले मत बाद होणार नाही postal voting avoid errors
१.आपणास संबंधीत सुविधा केंद्रावर मोठे पाकीट दीले जाईल.(C)
२. ते पाकीट एका बाजूने फाडून उघडणे .
3. त्यात आणखी एक पाकीट आहे(B)
4. हे B पाकीट मद्ये यापेक्षा छोटे (A) पाकीट व घोषणा पत्र आहे.हे मतदान कक्षात जाऊन बाहेर काढणे. व सर्वात छोटे असनारे A पाकिटातून मत पत्रिका बाहेर काढणे.
5. मत पत्रिकावरील क्रमांक प्रथम घोषणापत्रावर नमूद ठिकाणी व छोट्या पाकिटावर पण अचूकपणे पेन ने टाकावा .घोषणा पत्रावरील संपूर्ण मजकूर भरावा.घोषणा पत्रावर तेथें उपस्थीत अधिकारी यांची सही व शिक्का घ्यावा.
6. मत पत्रिका वर आपले आवडत्या उमेदवार समोर नमूद ठिकाणीं ✔️ किंवा ❌ असे चिन्ह ची खून करावी.हे करत असताना वरच्या व खालच्या उमेदवार यांच्या पर्यंत आपली खुनाची रेषा चीटकायला नको
7. पहिल्या सारखी घडी घालून A पाकीट मध्ये पत्रिका टाकून डिंक ने बंद करने
8. घोषणापत्र व हे पाकीट B पाकीट मध्ये टाकून बंद करने.इथे चूक होते ती टाळावी. घोषणापत्र व A पाकीट वेगळे आहे. घोषणापत्र मत पत्रिका सोबत A मद्ये बंद करायचा नाहीं.
9. मग B पाकिटावर खालच्या बाजूला विहित ठिकाणी सही करायची व हे B पाकीट पेटीत टाकायचे.
मग मत मोजले जाते.
१ घोषणा पत्रावर मत पत्रिका क्रमांक नसणे
२. attestation अधिकारी सही नसणे
3. खूण चुकीच्या पद्धतीने नेमके कोणाला मत दीले असे न समजनेसारखी करणे
4. B पाकिटावर सही नसणे
हि रद्द ची कारणे आहेत🙏