विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची कार्यपद्धती postal ballot process gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची कार्यपद्धती postal ballot process gr 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती.

संदर्भः भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.५२/२०२३/SDR/Vol.IV. दि.३१ ऑक्टोबर, २०२३.

महोदय/महोदया,

निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम १८, १८ए तसेच नियम २० (१) नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे (Postal Ballot Papers) मतदान करण्याबाबत तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या दि.३१.१०.२०२३ च्या पत्रातील

परि.१४ अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ मध्ये राज्यात पाच टप्यामध्ये मतदान घेण्यात आले. त्या वेळी

सुविधा केंद्राद्वारे मतदान केलेल्या अन्य विधानसभा मतदार संघांच्या मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची आदानप्रदान करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या होत्या. काही टप्प्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या मतदार संघांसाठी केंद्रीय समन्वय केंद्र (Centralized Clearing Centres) विभागस्तरावर केली होती व त्या द्वारे अर्ज तसेच टपाली मतपत्रिकांचे आदानप्रदान करण्यात आले होते, विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ कमी टप्प्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मतदार असलेल्या मात्र निवडणूक कर्तव्यार्थ अन्य मतदार संघात नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्रपत्र-१२ भरुन देण्याची शक्यता असल्याने निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या टपाली मतपत्रिकांची

संख्या जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रपत्र-१२ तसेच टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदानांच्या योग्य समन्वयासाठी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ करीता जिल्हा समन्वय केंद्र तसेच राज्यस्तरीय

समन्वय केंद्र तयार करुन त्या द्वारे टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदाना बाबतची कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली असून ती सोबत पाठविण्यात येत आहे. सदर कार्यपद्धती अवलंबून टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदान तसेच निवडणूक कर्मचा-यांच्या मतदानाची कार्यवाही करण्यात यावी.

टपाली मतपत्रिका शासन परिपत्रक येथे पहा

टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या तसेच निवडणूक कर्तव्यार्थ प्रमाणपत्राद्वारे (EDC) मतदान करु इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांकरिता अनुक्रमे प्रपत्र-१२ व १२अ NIC मार्फत DEO Login वर pre-filled उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ संदर्भातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांकापासून DEO Login वर उपलब्ध करून देण्यात आलेले अनुक्रमे प्रपत्र-१२ व १२अ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी Download करुन घ्यावे व प्रपत्र-१२ व १२अ यांचे निवडणूक कतव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रासोबत वाटप करण्यात यावे, तसेच, प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी जास्तीतजास्त प्रमाणात संबंधित कर्मचाऱ्यांनी सही केलेले प्रपत्र १२ व १२अ तसेच त्यांच्या मतदार ओळखपत्राची प्रत (EPIC) उपलब्ध करुन घ्यावी.

तद्नंतर उपरोक्त कार्यपद्धती (SOP) मध्ये नमूद केल्याप्रमाणे विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतपत्रिकेबाबत नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्याने आयोगाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याच्याकडे प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ चे वर्गीकरण विधानसभा मतदारसंघ निहाय करावे व आपला मतदार संघ वगळता इतर मतदारसंघामध्ये मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रपत्र १२, कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश व मतदार ओळखपत्राची प्रत स्कैन करुन ऑनलाईन पद्धतीने (upload करुन) NIC च्या Software मार्फत संबंधित कर्मचारी ज्या विधानसभा मतदार संघाचा मतदार असेल त्या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात यावे. ही प्रक्रिया दररोज करावयाची असून त्या सोबत आयोगाच्या पत्रात नमूद केलेल्या जोडपत्र-४ मधील यादी सुद्धा पाठवायची आहे. तद्नंतर टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदानाच्या वेळी उपरोक्त कर्मचाऱ्यांचे मूळ प्रपत्र-१२ सुद्धा संबंधित समन्वय अधिकाऱ्याकडे उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. अन्य सर्व कार्यवाही भारत निवडणूक आयोगाच्या पत्रातील निर्देश तसेच या कार्यालयाने निश्चित करुन दिलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी.

निवडणूक कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका शासन निर्णय येथे पहा Clickhere

केंद्रिय समन्वय केंद्राचे (State Clearance Centre) स्थळ स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. त्याचप्रमाणे निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेले पोलीस कर्मचारी तसेच अशासकीय कर्मचारी यांना न भरलेले प्रपत्र १२/१२-अ संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात यावेत व उर्वरित प्रक्रिया आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी.

NIC सॉफ्टवेअर संदर्भात काही अडचणी/समस्या निर्माण झाल्यास त्या संदर्भात आपल्या जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांच्या मार्फत NIC यांच्याशी संपर्क करण्यात यावा.

निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-याना टपाली मतपत्रिकेद्वारे (Postal Ballot Paper) मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती

निवडणूक संचालन नियम, १९६१ तसेच भारत निवडणूक आयोगाच्या पत्राद्वारे दिलेल्या सूचना.

निवडणूक संचालन नियम-१९६१ चे नियम-१८, १८-ए, २०.

भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ५२/२०२३/SDR/Vol.IV dated ३१० October. २०२४.

निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम १८ नुसार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणा-या व्यक्तिंचे प्रवर्ग निश्चित करण्यात आले असून त्यानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध आहे. सदर नियमातील नियम २०(१) नुसार निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त मतदाराला टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करावयाचे असल्यास संबंधित मतदारास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मतदानाच्या किमान ०७ दिवस आधी प्रपत्र-१२ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे व त्या नंतर संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करुन संबंधित मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते.

उपरोक्त नियमांमध्ये दि.२३.०८.२०२३ रोजी नियम १९८-५ नव्याने अंतर्भूत करण्यात आला असून वरील प्रयोजनार्थ प्रपत्र-१२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचान्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे. पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दि.३१.१०.२०२३ च्या पत्रान्वये लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांकरिता टपाली मतपत्रिकेद्वारे करावयाच्या मतदाना संदर्भात सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यामध्ये परि.१४ मध्ये

निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदाराच्या मतदाना संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ मध्ये राज्यात पाच टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आले. त्या वेळी सुविधा

केंद्राद्वारे मतदान केलेल्या अन्य विधानसभा मतदार संघांच्या मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची आदानप्रदान करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या होत्या. काही टप्प्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या मतदार संघांसाठी केंद्रीय समन्वय केंद्र (Centralized Clearing Centres) विभागस्तरावर केली होती व त्या द्वारे अर्ज तसेच टपाली मतपत्रिकांचे आदानप्रदान करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ कमी टप्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मतदार असलेल्या मात्र निवडणूक कर्तव्यार्थ अन्य मतदार संघात नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्रपत्र-१२ भरुन देण्याची शक्यता असल्याने निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या टपाली मतपत्रिकांची संख्या जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रपत्र-१२ तसेच टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदानांच्या योग्य समन्वयासाठी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ करीता जिल्हा समन्वय केंद्र तसेच राज्यस्तरीय समन्वय केंद्र तयार करुन त्या द्वारे टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदाना बाबतची कार्यवाही करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका शासन परिपत्रक येथे पहा

Join Now