मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२९ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत police bharti recruitment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२९ प्रतिक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने, त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत police bharti recruitment 

दि. २०/०६/२०२४.

संदर्भ :- १) जा.क्र.पोआ/कक्ष-९ (पोभ)/९(१)/१५५६/२०२३. दि. २५/०९/२०२३. २) जा.क्र.पोआ/कक्ष-९ (पोभ)/९ (१)/५६७/२०२३, दि. ०४/१२/२०२३.

उपरोक्त संदर्भ क्र.१ नुसार, मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरतो निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनूसार, त्याचप्रमाणे संदर्भ क्र.२ नुसार अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील ८२ उमेदवारांची निवड रद्द झालेली असल्यामुळे, प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचा समावेश शासनाच्या तरतुदीनुसार करण्यात येत आहे. त्या उमेदवारांची यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.

पोलीस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम प्रतिक्षा यादीतील ८२ उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत करण्यात आला असून, सदर उमेदवारांनी दिनांक २७/०६/२०२४ रोजी कागदपत्र पडताळणीकरीता कक्ष-१ (भरती कक्ष) संगणक कक्ष, तळ मजला, पोलीस मुख्यालया समोर, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई येथे सकाळी १०:०० वाजता हजर रहावे.

उमेदवारांनी खालील नमूद सुचनांचे पालन करावे व त्याप्रमाणे वेळेवर उपस्थित रहावे.

१. आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक राहील.

२ . दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक राहील.

३. उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. (उदा. आधारकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक

आयोगाचे ओळखपत्र वाहनचालक परवाना इ. शासकिय ओळखपत्र)

४. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रतीचा संच सोबत घेवून येणे आवश्यक राहील.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment