शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर पुढील २५ दिवसांत PM SHRI शाळांमध्ये वेळापत्रकानुसार उपक्रम राबविणेबाबत pm shri yojana
PM SHRI योजनेतंर्गत दि. १३ नोव्हेंबर, २०२४ ते १२ डिसेंबर, २०२४ या कालावधीत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर पुढील २५ दिवसांत PM SHRI शाळांमध्ये वेळापत्रकानुसार उपक्रम राबविणेबाबत.
संदर्भ:- केंद्र शासनाचे पत्र क्र. D.No.१-८/२०२३-१४-१९, दि.२७/०९/२०२४.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने PM SHHI योजनेतंर्गत देशभरात १४,५०० हून अधिक PM SHRI शाळा स्थापन करावयाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने PM SHRI योजनेअंतर्गत देशभरात ३२ राज्ये / केंद्रशासित प्रदेश / KVS/NVS इत्यादि मिळून १२,०८४ PM SHRI शाळांची निवड करण्यात आली आहे.
२ केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या ३११ अशा एकूण ८२७ शाळांना उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) मधील शिफारशीच्या अनुषंगाने PM SHRI शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे हे आपणांस ज्ञात आहे. म्हणजेच PM SHRI शाळांव्दारे इतर नजिकच्या शाळांना समतापूर्ण व आनंददायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करावयाचे आहे.
PM SHRI उपक्रम राबविणे बाबत शासन निर्णय Click Here
३ उपरोक्त केंद्र शासनाच्या दि.२७/०९/२०२४ च्या पत्रान्वये शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने PM
SHRI शाळांमध्ये १. Vidya Vaibhav (Olympiad) २. Manthan Mandal (Debate Club) ३. Digital Quest आणि Discover and Learn Local Sites इत्यादि उपक्रम पुढील २५ दिवसांत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर उपक्रमांमुळे PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना, चिकीत्सक विचारास प्रोत्साहन, आणि सर्जनशीलतेस प्रोत्साहन मिळेल परिणामी PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास विकसित होईल. सदर पुढाकारांमुळे तळागाळातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभांची जोपासना होण्यास मदत होईल आणि त्यांना जिल्हा आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी प्राप्त Jawahar bal Bhavan, Netaji Subhash Marg, Charmi Road, Mumbai-400 004. DiSakshi 267, 2367 1808, 2367 1809, 2367 9274 E-mail mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in Website: https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in 223
होईल. परिणामी त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या वाढीस चालना मिळेल. अंमलबजावणी करण्याच्या उपक्रमांचा कृती आराखडा परिशिष्ट-अ मध्ये जोडण्यात आलेला आहे.
४ त्यानुषंगाने जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये वेळापत्रकानुसार सर्व उपक्रमांची
अंमलबजावणी करण्यात यावी. अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या नियमित उपक्रमांची अद्ययावत
माहिती PM SHRI शाळांच्या सोशल मीडिया हँडलवर (फेसबुक, एक्स इ.) पोस्ट टाकण्यात यावीत. परिणामी PM SHHI योजनेविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल.
5 तसेच जिल्हा व महानगरपालिकांनी PM SHRI शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या नियमित उपक्रमांची अद्ययावत माहिती गुगल ट्रॅकर भरण्यात यावी.
https://docs.google.com/spreadsheets/d/1E1AsIwYXxVMrerl.epNG7UallL3Pwswl3JvuPuAJMPw8 0/edit?usp=sharing
6 सदर उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांना व अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत करावे, तसेच तालुका नोडल अधिकारी यांनी PM SHRI शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दररोज जिल्हा नोडल अधिकारी यांना सादर करणे, आणि जिल्हा नोडल अधिकारी यांनी या कार्यालयास अंमलबजावणी करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती नियमित या कार्यालयास सादर करावी.