प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना pm poshan parasbag upkram
वाचा:-१) शाळांमध्ये परसबागांबाबत (School Nutrition Gardens) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. १५ ऑक्टोंबर, २०१९.
२) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना
दि.२१ डिसेंबर, २०२२.
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३, दि.११ जुलै, २०२३.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३ दि.०५ सप्टेंबर, २०२३.
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ.क्र.प्र/२०१८-१.डी.एस/७१३, दि. २७ फेब्रुवारी, २०२४.
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३, दि.२१ जून, २०२४.
प्रस्तावना:-
केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन
सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे
निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यामध्ये
प्रस्तुत उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील सर्व पात्र शाळांमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या
आहेत. तसेच, परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा
आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा शालेय पोषण
आहारात समाविष्ट करुन विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी
जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.
प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची समिती शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२३ अन्वये गठीत करण्यात आली होती. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व) आहार देण्याचा निर्णय दि.११ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये मोड आलेल्या कडधान्य (स्प्राऊट्स) या पाककृतीमध्ये परसबागेतील उत्पादित कांदा, टोमॅटो, कोबी, लिंबू इ. बाबींचा समावेश करणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यासाठी तसेच परसबागेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
१) केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील योजनेस पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला इ. पदार्थांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.
२) राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याकरीता मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्ट प्रमाणे राहतील.
३) प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०७२५१४५३४०४३२१ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.