प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नागरी भागातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत pm poshan mid day meal
प्रस्तावना:-केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून
राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
सदर योजनेंतर्गत नागरी भागातील ज्या शाळांमध्ये धान्य साठविण्यासाठी तसेच
स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहार
पुरवठा करण्यात येतो. यासाठी संबंधित महानगरपालिका / नगरपालिका नगरपरिषद /
कटकमंडळे यांच्या स्तरावर स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रिया राबवून महिला बचत गट / स्वयंसेवी संस्था / अशासकीय संस्था यांची निवड करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथ.) यांच्या स्तरावरून दि.१६ मार्च, २०१९ व दि.१३ मे. २०२२ रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यात महानगरपालिका/नगरपालिकाक्षेत्रात अन्न शिजवणाऱ्या संस्थांची निवड करण्यात येत आहे. सदरप्रमाणे केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी संस्थांच्या निवडीकरीता राबविण्यात येणाऱ्या स्वारस्याच्या अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेमध्ये अनियमितता होत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. तसेच, केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीव्दारे पुरवठा करण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे पुरक आहार न देणे आदीबाबतच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. तसेच, नियुक्त महिला बचत गट/ संस्था यांना मुदत संपल्यानंतरही शासन धोरणाविरुध्द महानगरपालिका/नगरपालिका स्तरावर परस्पर मुदतवाढ देण्याची प्रकरणे शासनाच्या निदर्शनास आले आहेत,
राज्यातील नागरी भागातील शाळांना केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या निवडीकरिता राबविण्यात येत असलेल्या स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारी लक्षात घेता, योजनेची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण / विकेंद्रिकरणाच्या दृष्टीने तसेच, जास्तीत जास्त महिला बचत गटांना तयार आहाराचा पुरवठा करण्याचे कामकाज मिळण्याकरीता नागरी भागातील योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नागरी भागातील ज्या शाळांमध्ये धान्य साठविण्यासाठी तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
1. नागरी भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचतगट / संस्थांची निवड करण्याचे अधिकार
यापुढे नागरी भागातील संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहेत.
नागरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने प्रति दिन प्रति विद्यार्थी निर्धारित केलेला तांदूळ व आहार खर्चाची रक्कम संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समित्तीस देण्यात येईल. नियुक्त बचत गट/संस्था यांनी शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीप्रमाणे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणे आवश्यक राहील.
iii. नागरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक स्तरावरील महिला बचतगट / संस्थांची प्राधान्याने नियुक्ती करण्याकरीता संबंधित शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बहुमताने ठराव करुन घेण्यात यावा. तसेच, शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्त केलेल्या बचतगट/संस्थासोबत प्रतिवर्षी करारनामा करण्यात यावा.
iv.
सद्यस्थितीत राज्यातील ज्या नागरी भागातील शाळांना केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालींद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्याकरीता महानगरपालिका/नगरपालिका यांच्यामार्फत स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेव्दारे महिला बचत गट / संस्थांची निवड करण्यात आलेली आहे. प्रस्तुत संस्था/महिला बचत गट यांच्यासोबत करण्यात आलेला करारनामा अस्तित्वात आहे तोपर्यंतच त्यांच्यामार्फत योजनेचा लाभ देण्यात यावा. सदर करारनाम्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रस्तुत संस्थांना/बचत गटांना कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ देण्यात येऊ नये,
महानगरपालिका / नगरपालिका / कटकमंडळ यांच्या स्तरावरुन स्वारस्यांची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेद्वारे निवड केलेल्या संस्था बचत गट यांच्याशी केलेला करारनामा संपुष्टात आल्यावर संबंधित महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील शाळांना बचतगट निवडीचे अधिकार राहतील. तद्नंतर संबंधित
महानगरपालिका/नगरपालिका/ कटकमंडळ यांनी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरीता स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रिया राबविण्यात येऊ नये.
महानगरपालिका/नगरपालिका कार्यक्षेत्रामधील योजनेंतर्गत पात्र शाळांपैकी काही शाळांना योजनेचा लाभ एखाद्या सेवाभावी अशासकीय संस्थेमार्फत (उदा. अक्षयपात्र, अन्नामृत इ.) देण्याबाबतचा ठराव संबंधित महानगरपलिका/नगरपालिका यांच्या सर्वसाधारण सभेने घेतला असल्यास त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे अधिकार संबंधित महानगरपालिका/नगरपालिका यांच्याकडे राहतील. प्रस्तुत महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील उर्वरित शाळांना आहार पुरवठा करण्यासाठी संस्था/बचत गट नियुक्तीचे अधिकार संबंधित शाळांना राहतील. तसेच, महानगरपालिका/नगरपालिका यांनी स्वयंसेवी संस्था यांना वाटप केलेल्या शाळांची माहिती संबंधित महानगरपालिका/नगरपालिका यांनी शिक्षण संचालक (प्राथ.) यांना देणे आवश्यक राहील.
७. नागरी भागातील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळांना आहार पुरवठा करण्यासाठी बचत गटांच्या निवडीचे निकष, देयके अदायगी, नियंत्रण आदीबाबतच्या सविस्तर सूचना शिक्षण संचालक (प्राथ) यांच्या स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१०१४१८०९५१७७२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.