प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत pm poshan mid day meal

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत pm poshan mid day meal 

प्रस्तावना:केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर डाटा एन्ट्री ऑपरेटर्स कार्यरत आहेत. सदर डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांना संदर्भाधिन दि.०१ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.२०,६५०/- प्रती माह इतके मानधन देण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन तसेच, किमान वेतन अधिनियम, १९४८ नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन

होती.

शासन निर्णय क्रमांकः शापोला-२०२२/प्र.क्र.४०/एस.डी.३

शासन निर्णय :-

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा रु.२५,०००/- इतके करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर

मानधन वाढ दि.०१ सप्टेंबर, २०२४ पासून लागू राहील.

२. यासाठीचा खर्च केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण आणि मूल्यमापन (MME) या घटकाकरिता मंजूर असलेल्या अनुदानामधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२६७/१४७१,

३. दि.२७/०६/२०२४ आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.८७४/व्यय-५. दि.२०/०८/२०२४

अन्वये मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

४. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९१३१९३५११२३२१ असा आहे. सदर आदेश

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.