केंद्र शासनाच्या CPGRAMS (PG PORTAL) या प्रणालीवर प्राप्त तक्रारींसाठी समन्वय अधिकारी नियुक्तीबाबत pgportal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र शासनाच्या CPGRAMS (PG PORTAL) या प्रणालीवर प्राप्त तक्रारींसाठी समन्वय अधिकारी नियुक्तीबाबत pgportal

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. पोर्टल-२०२४/प्र.क्र.९९/समन्वय-२, दि.१२/०९/२०२४

शासन परिपत्रक :-

CPGRAMS (PG PORTAL) ही तक्रार निवारण यंत्रणा राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी “वाचा” येथील शासन परिपत्रकान्वये राज्य सूचना विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, महाराष्ट्र, मुंबई यांची राज्याचे समन्वय अधिकारी (State Nodal Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, आता, यामध्ये सुधारणा करण्यात येत असून त्यानुसार CPGRAMS (PG PORTAL) ही तक्रार निवारण यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या हाताळण्यासाठी राज्याचे समन्वय अधिकारी (State Nodal Officer) म्हणून राज्य सूचना विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, महाराष्ट्र, मुंबई (NIC) यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच, प्रशासकीय बाबींचे समन्वय राखण्यासाठी राज्याचे समन्वय अधिकारी (State Nodal Officer) म्हणून सहसचिव/उपसचिव (समन्वय-२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे संबंधित सहसचिव/उपसचिव हे समन्वय अधिकारी या नात्याने जबाबदारी पार पाडतील. तथापि, “वाचा” येथील शासन परिपत्रकान्वये दिलेल्या उर्वरित सूचना अंमलात राहतील.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र २०२४१२१८१८२७४७८९०७ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.