राष्ट्रपिता “महात्मा गांधी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रपिता “महात्मा गांधी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

महात्मा गांधी

गांधीजींना भारतातले सारे लोक ‘बापू’ म्हणतात. भारतातल्या अर्धपोटी, अर्धनग्न लोकांत प्रचंड सामर्थ्य निर्माण करण्याची कामगिरी बापूजींनी केली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी गरिवांतील गरिबाला, दुबळ्यांतील दुबळ्याला सहभागी होण्याची प्रेरणा दिली. त्यांच्यामधली भीती नाहीशी केली. पारतंत्र्य, दारिद्र्य यांमुळं निर्माण झालेली लाचारी नष्ट केली. आपण सारे भारतीय आहोत, याचा अभिमान लोकांमध्ये निर्माण केला. भारताच्या जनजीवनाशी, दारिद्र्याशी आणि लोकांच्या सुखदुःखांशी बापूजी पूर्णपणे समरस झालेले होते.

गांधीजींचा जन्म गुजरातमधल्या पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. त्यांच्या घरचं वातावरण सुसंस्कृत होतं. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आईचं नाव पुतळीबाई. आईवर त्यांचं विलक्षण प्रेम आणि श्रद्धा होती. गांधीजींना भारतीय स्त्रियांची सुखदुःखं कळू शकली, याचं श्रेय गांधीजी आपल्या आईला देत.

शालेय शिक्षण संपवून गांधीजी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आले. एका अशिलाची केस चालवण्यासाठी १८९३ साली बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी,

वय वर्ष २४, हे दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यांच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रवासाची सुरुवात झाली.

दक्षिण आफ्रिका आणि भारत हे त्या काळी ब्रिटिश साम्राज्याचे भाग होते. या दोन्ही देशांतील जनता ही एकाच साम्राज्याची प्रजा, तेव्हा या प्रजेचे हक्क सारखेच असणार. निदान अत्तायला हवेत, असं इंग्लंडमध्ये कायदा शिकलेल्या गांधीजींना वाटत होतं; परंतु गोऱ्या लोकांचा वर्णद्वेष हा किती भयंकर असतो, आपण राज्यकर्ते आहोत, गोरे आहोत, आपला वंश श्रेष्ठ आहे, अशा अहंकारानं पछाडलेले इंग्रज लोक भारतीयांसारख्या कृष्णवर्णीयांचा किती ट्वेष करतात, याचा प्रत्यक्ष अनुभव गांधीजींना आला.

दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेनं प्रवास करत असताना, पहिल्या वर्गाचं तिकीट जवळ असूनही गांधीजींना डब्यातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. कारण काय, तर ते काळे होते ! म्हणजे पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचा अधिकार फक्त गोऱ्या लोकांना. गांधीजींनी या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निर्धार केला. एक ज्वालामुखी जागा झाला.

गांधीजींना आलेला अनुभव दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्याच गौरेतरांना येत असे.

त्याविरुद्ध त्यांच्या मनात संतापही उसळे; परंतु या अन्यायाचा प्रतिकार कसा करावा, हे त्यांना कळत नव्हतं. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांचं सरकार केवढं सामर्थ्यवान, त्याच्याजवळ फौजफाटा, दारूगोळा आणि आपण तर निःशस्त्र, कसा लढा दयायचा ?

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना एकत्र केलं. ‘नाताळ हिंदी काँग्रेस’ ही संघटना स्थापली. त्यांची एकजूट केली, त्यांना निर्भय बनवलं आणि त्यांच्या हाती एक अमोघ शस्त्र दिलं.

या लोकविलक्षण शस्त्राचं नाव होतं सत्याग्रह. जे सत्य आहे, अशी आपली खात्री असेल, त्याचा कोणाच्याही विरोधाला न जुमानता पुरस्कार करणं! गांधीजींचं असं सांगणं होतं, की विरोधकांचा प्रतिकार सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीनं अहिंसक मार्गांनीच केला पाहिजे, कारण हिंसेपेक्षा ते प्रभावी ठरतात. हिंसेचा पराभव अधिक हिंसा वापरून करता येतो, अहिंसेचा पराभव होणं शक्य नसतं. हिंसेतून हिंसा आणि द्वेषातून द्वेषच वाढतो, म्हणून विरोधकांना प्रेमानंच जिंकण्याचा प्रयत्न सत्याग्रहीनं केला पाहिजे. जे प्रेमामुळं साधतं, ते कायम टिकतं.

प्रत्येक माणसाच्या मनात चांगुलपणा असतोच. काही वेळा तो हिंसेच्या वा संतापाच्या आड दडलेला असतो. प्रेम अहिंसेच्या मार्गांनी या चांगुलपणाला जागवता येतं. हे मार्ग कधीकधी खूप कष्टाचे ठरतात, पण अंतिम विजय सत्याचा होणं अटळ असल्यामुळं हे कष्ट, हे क्लेश सोसूनही या मार्गांवर चिवटपणं चालत राहण्याचा सल्ला गांधीजींनी सत्याग्रहींना दिला आहे. त्यांच्या मते, सत्याग्रहाचं शस्त्रच असं असतं, की जे वापरणाऱ्याचं मन शुद्ध करतं आणि विरोधकांच्या माणूसपणाला जाग आणतं, त्यांचं हृदयपरिवर्तन करतं. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी हे सत्याग्रहाचं शस्त्र वापरलं. सुरुवातीला सरकारनं दंडेली केली, अत्याचार केले; पण

शेवटी सरकार नमले. भारतीयांसाठी असलेले नोंदणी, ओळखपत्र असले अपमानास्पद ३ अन्यायकारक कायदे सरकारनं मागं घेतले. सत्याग्रहाच अस्त्र तावून सुलाखून निघालं आणि यशस्वी झालं.

१९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले, ते सत्याग्रहाचे सेनानी म्हणून लोक त्यांना आता महात्मा गांधी म्हणू लागले होते.

गांधीजी भारतात आले, तेव्हा भारतीय राष्ट्रीय सभेच्या कामात थोडा थंडपणा आलेला होता. राष्ट्रीय सभेची सूत्रं नेमस्तांकडं होती. नेमस्तांचे पुढारी ना. गोपाळ कृष्ण गोखल्यांविषयी गांधीजींच्या मनात नितांत आदर होता. जे नीतिनियम, जी सभ्यता आणि सुसंस्कृतता आपण खासगी जीवनात आदर्श मानतो, तीच राजकारणातही पाळली गेली पाहिजे, यावर गोखल्यांचा कटाक्ष होता. गांधीजींना हा विचार पूर्णपणे मान्य होता. गांधीजींनी गोखल्यांना आपले गुरू मानले. गांधीजी म्हणत, की जीवनाचं ध्येय जितकं महत्त्वाचं, तितकंच महत्त्व ते ध्येय साधण्याच्या मार्गांनाही असतं. आपलं ध्येय उच्च असलं पाहिजे आणि आपली साधनं शुद्ध असली पाहिजेत.

गोखल्यांच्या सांगण्यावरून एक वर्ष गांधीजींनी भारतभर प्रवास केला. आपल्या देशाचं सौंदर्य पाहिलं आणि त्याचबरोबर जनतेचं भकास दारिद्र्यही. त्यांनी पाहिलं, लोकांना खायला अन्न नाही, लाज राखण्यापुरतं वस्त्रही नाही. गांधीजींचं हृदय कळवळलं. हे दुःख जर दूर व्हायचं असेल, तर इथून परकी सत्ता गेली पाहिजे. ती घालवण्यासाठी झगडावं लागेल. त्यासाठी सामान्य माणसांना संघटित करावं लागेल.

गांधीजींनी चंपारण्यातल्या शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा प्रश्न धसाला लावण्याचं ठरवलं. निळीच्या उत्पन्नासाठी युरोपीय मळेवाले, हिंदी सावकार, व्यापारी हे या शेतकऱ्यांचं शोषण करत. सरकारकडं दादफिर्याद मागण्यात अर्थच नव्हता. गेली अनेक वर्षं बिहारमधला शेतकरी असा नाडला जात होता. गांधीजींनी यावर कठोर हल्ला करायचं ठरवलं. आपल्या सहकाऱ्यांनिशी त्यांनी चंपारण्यात सत्याग्रह केला. अखेर सरकारला नमतं घेणं भाग पडलं. भारतातला पहिला सत्याग्रह असा यशस्वी झाला.

चंपारण्याच्या सत्याग्रहामुळं देशातील वातावरणच बदललं. या वातावरणाचा अंदाज इंग्रज सरकारला आलाच नाही. पहिलं महायुद्ध संपल्यावर ब्रिटिश सरकारनं अमानुष दडपशाही सुरू केली. रौलट कायदयासारखे माणुसकीला काळिमा फासणारे कायदे पास केले. पंजाबात

जालियनवाला बागेत हजारो निष्पाप भारतीयांची क्रूर हत्या केली. गांधीजींनी याविरुद्ध सत्याग्रह करण्याचं ठरवलं. राष्ट्रीय सभेनं लब्धाची सारी सूत्रं गांधीजीकडं सोपवली

मुस्लिमांचा धर्मप्रमुख खलिफा याच्या राज्यावर इंग्रजांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात आक्रमण केलं होतं. त्याविरुद्ध भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली, तिला ‘खिलाफत चळवळ’ असं म्हणतात. या वेळी गांधींनी खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला

गांधीजींनी सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारलं. या आंदोलनानं सारा देश पेटून

उठला. उत्तर प्रदेशातील चौरीचौरा या गावी प्रक्षुब्ध जमावाच्या हातून हिंसा घडली. गांधीजीनी

या हिंसेची नैतिक जबाबदारी स्वीकारली. अनेकांचा रोष पत्करून त्यांनी लढा मार्ग घेतला.

सरकारनं गांधीजींना कैद करून राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला भरला. गांधीजींनी आरोप मान्य केला. ते म्हणाले,

‘जुलमी, अन्याय्य कायद्यांचा भंग करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. मी ते बजावत आहे. मला जर सोडलं, तर मी पुन्हा तेच करीन.’

कोर्टानं गांधीजींना सहा वर्षांची सजा दिली.

१९२७ साली भारतात आलेल्या सायमन कमिशनवर राष्ट्रीय सभेनं बहिष्कार टाकला. देशात चैतन्याचे वारे वाहू लागले. काहीतरी अघटित घडणार, असं साऱ्यांनाच वाटत होते.

आणि एक दिवस अचानक बातमी आली :

गांधीजी मिठाचा सत्याग्रह करणार !

मार्च, १९३० मध्ये गांधीजींनी दांडीयात्रा काढली. साबरमती आश्रमातून ते निघाले, ३८५ किलोमीटर पदयात्रा करून दांडी येथे आले. तिथं जाहीरपणं त्यांनी मिठाचा कायदा तोडला. आश्रमातून निघताना त्यांच्याबरोबर ७८ सहकारी होते. दांडीच्या सागरतीरावर पोहोचेपर्यंत हजारोजण त्यात सामील झाले.

साऱ्या देशभर मिठाचा कायदा मोडण्याचे सत्याग्रह सुरू झाले. जिथं मिठागरं नव्हती, समुद्रकिनारा नव्हता, तिथं जंगलविषयक कायदे मोडण्यात आले. या सत्याग्रहात देशाच्या कोनाकोपऱ्यांतील शेतकरी, कामगार, आदिवासी अशा सगळ्यांनी हिरिरीनं भाग घेतला. सुरुवातीला यः कश्चित वाटणारी ठिणगी आता वणवा झाली. सारा देश या वणव्यानं व्यापून टाकला.

सरकारनं अमानुष दडपशाही केली. हजारो लोकांना कैद केलं. गोळीबार, लाठीहल्ले केले. सत्याग्रहींनी सगळं सहन केलं. लाठीचा तडाखा बसत असताना त्यांच्या तोंडी घोषणा होत्या,

भारतमाता की जय !’, ‘महात्मा गांधी की जय ।’

गांधीजींना अटक झाली, परंतु सत्याग्रहाची तीव्रता कमी होईना, तेव्हा सरकारन गांधीजींशी सामोपचाराची बोलणी केली. सत्याग्रहींची मुक्तता केली आणि गांधीजी इंग्लडमधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले.

गांधीजींचा भर राष्ट्र घडवण्यावर होता. या राष्ट्र घडवण्याच्या कार्यक्रमाला ते विधायक कार्यक्रम म्हणत. या विधायक कार्यक्रमाचं प्रतीक होतं चरखा. चरख्यावर सूतकताई करून ग्रामोद्योगाला चालना देणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.

चरखा हे अत्यंत सार्थ यंत्र. कोणालाही वापरता येण्याजोगं. घरच्या घरी स्त्रिया, पुरुष, मुलांनाही चालवता येण्याजोगं. गरिबांसाठी उत्पन्नाचं साधन होऊ शकणारं.

खेडोपाडी, घराघरांतून असंख्य चरखे फिरू लागले. खादी हे राष्ट्रभक्तीचं, देशप्रेमाचं लक्षण झालं. खादी आणि ग्रामोद्योग हे आर्थिक स्वातंत्र्याचे दोन आधारस्तंभ झाले.

‘खरा भारत खेड्यांतच आहे’, अशी गांधीजींची धारणा होती. त्यांच्या साऱ्याच विचारांचा केंद्रबिंदू गरिबांतला गरीब माणूस असे. सगळ्या योजना आखताना या ‘शेवटच्या’ माणसाला डोळ्यांसमोर ठेवा, त्याचं हित होईल असं पाहा, असं ते आवर्जून सांगत. सर्वोदय हे त्यांच्या विचारांचं सार होतं.

दलितांचा प्रश्न हा गांधीजींना बेचैन करणारा एक महत्त्वाचा प्रश्न होता. अस्पृश्यता हा राष्ट्रावरचा व मानवतेवरचा दुष्ट कलंक आहे, असं त्यांचं मत होतं. तो नष्ट करण्यासाठी त्यांनी साऱ्या आयुष्यभर झगडा दिला. अस्पृश्यांना ते ‘हरिजन’ म्हणत. या देशाची प्रचंड शक्ती जातीपातीच्या भ्रामक समजुतीपायी वाया जात आहे, याचं त्यांना दुःख होई. भारतीय समाजाचं हे दुभंगलेपण नष्ट होणं, तो एकसंध होणं, हाही त्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नाचा एक भाग होता.

१९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. भारतातील इंग्रज सरकारच्या युद्धविषयक धोरणाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह समूहानं करायचा नसून प्रत्येक व्यक्तीनं स्वतंत्रपणं करायचा होता. गांधीजींनी आचार्य विनोबा भावे यांची पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली होती.

८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईला भरलेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात गांधीजींनी ‘चले जाव’ची घोषणा केली. त्यांनी इंग्रजांना तत्काळ भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा आदेश दिला. जर इंग्रज बऱ्या बोलानं गेले नाहीत, तर ते जाईस्तोवर संघर्ष करण्याची घोषणा केली. आम भारतीय जनतेला त्यांनी एकच संदेश दिला, ‘करेंगे या मरेंगे’.

या संदेशानं क्रांतीच्या ज्वाळा भडकल्या सरकारनं गांधीजी, त्यांच्या पत्नी करतुत्या व सचिव महादेवभाई देसाई यांना तत्काळ अटक केली; परंतु गांधीजींनी प्रत्येकाला अहिंसात्मक मार्गानं लढा चालू ठेवण्याचा आदेश दिलेला होता. त्याप्रमाणं लदा चालकाला औ

१९४५ साली महायुद्ध संपलं. भारतीय स्वातंत्र्याविषयी सहानुभूती असणाऱ्या मजूर पक्षाचं सरकार इंग्लंडमध्ये सत्तेवर आलं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वाटाघाटींना अधिक वेग आला. मुस्लिम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह धरला. काँग्रेसवर दडपण आणण्यासाठी जागोजाग जातीय दंगली घडवून आणल्या.

बंगालमधल्या नोआखाली भागात तर दंगलींचा आगडोंब उसळला होता. निष्पाप, निरपराध लोकांची हत्या होत होती. गरिबांची भांडीकुंडी, गाडगीमडकी, झोपड्या यांचा सर्रास विध्वंस होत होता. या दुःखितांना कोणी वाली नव्हता. धर्मांधतेनं पेटलेल्या त्या वणव्यात गांधीजी एकटेच गेले. साऱ्या वाटाघाटींपेक्षा जास्त महत्त्वाचं काम त्यांना करायचं होतं. दुःखितांचे अश्रू पुसायचे होते. त्यांना आधार दयायचा होता. त्यांच्यांत पुन्हा विश्वास निर्माण करायचा होता.

ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी भारताचा राष्ट्रपिता दुःखितांचे अश्रू

पुसत होता. गांधीजींच्या मनाविरुद्ध देशाची फाळणी झाली. फाळणीनंतर लाखो निर्वासित दिल्लीला

आले. सर्वस्व गेलेले, भविष्याविषयी अंधार असलेले हे निर्वासित. सूडानं दिल्ली पेटली. प्रचंड

दंगली उसळल्या. गांधीजी कोलकत्याहून दिल्लीला आले. रोज सायंप्रार्थनेतून सांगू लागले,

‘झालं गेलं विसरून जा. आतातरी आपण शांततेनं एकत्र राहूया.’

पण सूडानं पेटलेल्या, अविवेकी मनापर्यंत त्यांचे शब्द पोहोचत नव्हते. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजी आपल्या सायंप्रार्थनेला जात असताना, नथुराम गोडसे याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ‘हे राम’ असं म्हणत गांधीजी कोसळले आणि एका तेजोमय जीवनाचा अंत झाला.

त्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू दुःखानं बेभान झालेल्या राष्ट्राला उ‌द्देशून म्हणाले, ‘या देशातून, आपल्या आयुष्यातून आज सगळा प्रकाश निघून गेला आहे. सगळीकडे निबिड अंधार पसरला आहे.’

ती व्यथा साऱ्या भारताची होती.

गांधीजींची थोरवी सांगताना प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले,

‘असा महान ऋषी युगायुगांत एकदाच होतो. हाडामांसाचा असा माणूस या भूतलावर प्रत्यक्ष वावरला, असं पुढच्या पिढ्यांना सांगितलं, तर त्यांचा विश्वास बसणार नाही.’