YCMOU कोर्सेस, प्रवेश प्रक्रिया, व शुल्क बाबत तसेच अभ्यासक्रम संपुर्ण माहिती pdf ycmou addmission
१. विद्याशाखेचा परिचय
विद्यापीठात एकूण आठ विद्याशाखा आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या एक वर्षात शिक्षणशास्त्र विद्याशाखेची स्थापना झाली. त्यानंतर शिक्षणशास्त्र विद्याशाखेने आपले नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. आज संपूर्ण महाराष्ट्र शिक्षणशास्त्र विद्याशाखेकडे नेतृत्वाच्या दृष्टीने पाहतो. अद्ययावतता, गतिमानता आणि नवोपक्रमांचे स्वागत ही या विद्याशाखेची वैशिष्ट्ये आहेत.
शिक्षणशास्त्र विद्याशाखेने आपल्या कार्यास सुनिश्चितरित्या आणि गुणवत्ता राहावी या दृष्टीने विद्याशाखेचे गुणवत्ता धोरण, व्रतविधान आणि उद्दिष्टे निश्चित केली. त्या अनुषंगाने विद्याशाखेत प्रमाणपत्रापासून संशोधनापर्यंत अनेक शिक्षणक्रम टप्प्या-टप्प्याने सुरू झाले. विद्याशाखेच्या स्थापनेनंतर अवघ्या एक वर्षात (१९९१) दूरशिक्षणाद्वारे बी. एड. शिक्षणक्रम सुरू करणारे संपूर्ण भारतातील हे पहिले मुक्त विद्यापीठ होय. त्यानंतर ह्या विद्याशाखेने अवघ्या दहा-पंधरा वर्षांत एम. फिल. शिक्षणशास्त्र (२००७), एम. फिल. शारीरिक शिक्षण (२००७), एम. एड. (१९९४), एम. ए. शिक्षणशास्त्र (२००७) असे उच्च पदवी शिक्षणक्रम सुरू केले. २०१५, २०१९ या शैक्षणिक वर्षांमध्ये पीएच.डी. शिक्षणशास्त्र आणि दूरशिक्षण या दोन क्षेत्रांमध्ये विद्यावाचस्पती Ph.D पदवी राबविण्यात आली. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या ध्येयास सुसंगत असे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणारे स्वयं-साहाय्य गट प्रेरक / प्रेरिका शिक्षणक्रम (२००२), बालसेविका (२००२), मूल्य शिक्षण, आशययुक्त अध्यापन पद्धती, शालेय व्यवहारांसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, घरकामगार कौशल्य विकास यांसारखे प्रमाणपत्र शिक्षणक्रमही कार्यान्वित केले. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी मुख्याध्यापकांसाठी शालेय व्यवस्थापन पदविका तर माध्यमिक शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणांचे आयोजन केले. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहचवण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासकेंद्रे स्थापन केली.
मुक्त विद्यापीठाची शिक्षणपद्धती दूरशिक्षणाची असते, तर ह्या विद्याशाखेत प्रवेश घेणारे विद्यार्थी सेवांतर्गत असतात. ह्याचा विचार करून शिक्षणक्रमांची व त्यातील प्रात्यक्षिकांची रचना केली. प्रत्येक प्राप्त अनुभव वास्तविक स्तरावर पडताळून पाहता यावा यासाठी विशेष प्रात्यक्षिकांचे नियोजन केले. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञांच्या मदतीने मुद्रित-अमुद्रित साहित्य तयार केले. ह्या विद्याशाखेतील शिक्षणक्रम व्यावसायिक असतात. त्याचा विचार करता अभ्यासकेंद्रांवर शिक्षणक्रमातील विशिष्ट प्रात्यक्षिके मार्गदर्शनाखालीच करता यावी, त्याचा सराव व्हावा या दृष्टीने संपर्कसत्रांचे आयोजन केले.
मुक्त विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखा अनेकविध पुरस्कारांनी विभूषित आहे हे सांगण्यास आम्हाला आनंद होतो. आंतरराष्ट्रीय पुरस्कारात डॉ. अनंत जोशी, संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा यांना COL कडून मिळालेला जीवनगौरव पुरस्कार, श्रीमती वानखेडे स्वाती, बी. एड., एम. एड. ची विद्यार्थिनी ह्यांना COL कडून मिळालेला Award of Excellence for Distance Education ह्यांचा समावेश होतो. इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. तसेच येथील प्राध्यापक वर्गासही राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वैयक्तिक पुरस्कार मिळालेले आहेत.
२. एम. ए. (शिक्षणशास्त्र) (M83) शिक्षणक्रमाविषयी
शिक्षणशास्त्र हे सामाजिकशास्त्र आहे. या शास्त्रातही पदव्युत्तर पदवी एम.ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रम असावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने सन २००१ साली त्याचा अभ्यासक्रम आकृतिबंध (Curriculum) प्रसिद्ध केला व त्यात एम.ए. शिक्षणशास्त्र यास पदव्युत्तर पदवीचा विषय म्हणून मान्यता दिलेली आहे. NEP 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर शिक्षणक्रमाची रचना करण्यात आलेली आहे.
एम.ए. शिक्षणशास्त्र निष्णात शिक्षणक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातील विविध घटकांचा अभ्यास करावा असे अपेक्षित आहे. विविध पातळींवरील सेवांतर्गत प्रशिक्षण, धोरण विकसन, चिकित्सा, शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन यासाठी निष्णात व्यक्तींची आवश्यकता आहे. काळानुरुप शिक्षण प्रक्रियेत होत गेलेले बदल अभ्यासणे गरजेचे आहे. शिक्षणशास्त्र ही विद्याशाखा आंतरज्ञानशाखीय (Multi- disciplinary) आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, व्यवस्थापनशास्त्र अशा अनेकविध विद्याशाखांमधून विविध तत्त्व, प्रणाली शिक्षणास मिळालेल्या आहे. या सर्वांचा अभ्यास एम.ए. शिक्षणशास्त्र निष्णात व्यक्तींनी करणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यापीठात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी पातळीवर बी.ए. शिक्षणशास्त्र राबविण्यात येत आहे. तर ओरिसा, आसाम आणि मुंबई विद्यापीठानेही एम.ए. शिक्षणशास्त्र हा शिक्षणक्रम सुरू केलेला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेल्या एम.ए. शिक्षणशास्त्र ह्या पदवीची दखल नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एन.सी.टी.ई.) या संस्थेनेही घेतलेली असून डी.एड./बी.एड. महाविद्यालयात शिकविण्यासाठी एम.एड./एम.ए. शिक्षणशास्त्रास मान्यता दिलेली आहे. (नियम क्र. २९/११/१९९५ (Annex-A) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध स्तरांवरील कार्यरत शिक्षकांना दैनंदिन कार्याशी निगडीत पदव्युतर पदवी घेण्याच्या दृष्टीने मुक्त विद्यापीठाने उचललेले हे एक नवे पाऊल आहे.
२.१ उद्दिष्टे
पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा शिक्षणक्षेत्रातील सहभाग स्पष्ट करणे.
. सामाजिक बदलाचा शिक्षणातील सहभागावर झालेला परिणाम स्पष्ट करणे.
मानसशास्त्रातील विविध शाखांमधून शिक्षणशास्त्र कसे विकसित झाले ह्याचे आकलन वृद्धिंगत करणे.
शैक्षणिक मानसशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, शिक्षणाचे समाजशास्त्र, मूल्यमापन इत्यादी क्षेत्रांतील ज्ञानपाळती उंचावण्यास मदत करणे.
. शैक्षणिक संशोधनासाठी आवश्यक ते ज्ञान, दृष्टी, कौशल्ये विकसित करणे.
शैक्षणिक नियोजन, प्रशासन, निरंतर व अनौपचारिक शिक्षण, शैक्षणिक तंत्रविज्ञान, प्रौढ शिक्षण या
क्षेत्रांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करणे. पर्यावरण शिक्षण, मानवी हक्क, जीवन कौशल्य, समावेशित शिक्षण याबाबतचे आकलन वृद्धिंगत करणे.
शिक्षणात ICT वापराबाबतची क्षमता विकसित करणे.
शैक्षणिक उद्योजकता कौशल्ये विकसित करणे.
विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्याची क्षमता विकसित करणे.
(३) क्षेत्रीय कार्य मूल्यमापन
(४) आंतरवासिता मूल्यमापन
(५) मौखिक परीक्षा
अ) अंतर्गत मूल्यमापन
अंतर्गत मूल्यमापन पुढील साधनांद्वारे करण्यात येईल वर्गचाचणी (Class Test), स्वाध्याय (Assignment), नोंद पुस्तिका (Record Book), परिसंवाद (Seminar), व्यष्टी अभ्यास (Case Study), प्रश्नमंजुषा (Quiz) अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार त्यात बदल होतील. शिक्षणक्रमाच्या गरजेनुसार इतरही साधनांचा वापर करावा.
आ) लेखी परीक्षा
लेखी परीक्षा ही सत्र पद्धतीने (सेमिस्टर) घेण्यात येईल. त्यामुळे वर्षातून २ वेळा म्हणजेच २ वर्षातून ४ वेळा दर सहा महिन्यांनी लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेसाठी ७० गुणांची परीक्षा असेल. अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दीर्घ (Essay), लघु उत्तरे (Short Answer), गुणात्मक प्रश्न (Quantitative Problems), वस्तुनिष्ठ प्रश्न (Objective type) अशा स्वरूपाची असेल.
अंतिम परीक्षेची गुण विभागणी खालीलप्रमाणे असते.
अंतिम परीक्षा एकूण ८० गुणांची असेल. सर्व अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका मराठीत आणि इंग्रजीत राहतील. ह्या शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी असल्याने ज्यांना उत्तरे अथवा लघुशोधप्रबंध इंग्रजीतून किंवा
हिंदीतून लिहावयाचे असतील त्यांना तशी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
उत्तरपत्रिकांची तपासणी केंद्रीय पद्धतीने संबंधित अभ्यासक्रमांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या साहाय्याने केली जाईल.
परीक्षा दरवर्षी नोव्हेंबर / डिसेंबर आणि मे / जून या महिन्यांमध्ये होईल. परीक्षा अर्ज परीक्षेपूर्वी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्याबाबतची सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवर असेल.
इ) एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यास त्या विषयाच्या पुनर्परीक्षेसाठी किंवा संशोधन अहवाल अपूर्ण असल्यास Online Repeater अर्ज भरावा व विद्यापीठाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या शुल्काप्रमाणे शुल्क
भरावे.
ई) Repeater विद्यार्थ्यांने ऑनलाईन परीक्षेचा अर्ज शिक्षणक्रमातील कोणतीही कृती अपूर्ण असल्यास भरावा लागेल. आवश्यक आहे, अन्यथा निकाल लागणार नाही.
उ) विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षेविषयीची सर्व माहिती, सूचना, परीपत्रके ही ‘Examination’ ह्या वर जाऊन वेळोवेळी पाहाव्यात.
लघुशोधनिबंध परीक्षा
१) अभ्यासकेंद्रावर लघुशोधनिबंध जमा करण्याची संधी वर्षातून दोनदा असते. लघूशोधनिबंधाच मूल्यमापन व मौखिक परीक्षा अभ्यासकेंद्रावरच घेण्यात येते ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.
२) लघू शोधप्रबंधाचे परीक्षण दोन परीक्षक करतील (एक बहिस्थ परीक्षक व एक अंतर्गत परीक्षक) लेखी अहवाल मूल्यमापनाव्यतिरिक्त मौखिक परीक्षाही असेल.
उत्तीर्णतेचे नियम
(१) प्रत्येक अभ्यासक्रमाच्या अंतिम लेखी परीक्षा व स्वाध्याय यामध्ये प्रत्येकी किमान ४०% गुण मिळविणे अनिवार्य आहे.
(२) लघु शोधप्रबंध उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५०% गुण मिळविणे अनिवार्य आहे. तसेच मौखिक परीक्षेत ५०% गुण मिळविणे अनिवार्य आहे.
(३) क्षेत्रीय कार्य आणि आंतरवासिता यात किमान ५०% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
(४) संपूर्ण शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी किमान ५०% गुण मिळविणे अनिवार्य आहे.
परिशीलन समिती (Revaluation Committee) सर्व एम.ए. शिक्षणशास्त्र अभ्यासकेंद्रांवर संशोधन अहवाल मूल्यमापन व मौखिक परीक्षा झाल्यानंतर सर्व अहवालांचे विद्यापीठात एकत्रितरित्या परिशीलन समितीकडून परिशीलन करण्याबाबतचा निर्णय विद्यापीठाच्या वैधानिक परिषद समित्याद्वारे मान्य केलेल्या जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
मूल्यमापनाबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला अभ्यासकेंद्रावर मिळेल.
अंतिम परीक्षेसाठी पात्रतेच्या अटी
(१) शिक्षणक्रमाच्या सर्व संपर्कसत्रांना उपस्थित राहून सर्व अंतर्गत कार्य पूर्ण केल्याबद्दलचे अभ्यासकेंद्र- प्रमुखांचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याने घेतले पाहिजे.
(२) प्रत्येक सत्रातील (Semester) संपर्कसत्रांत ८०% उपस्थिती अनिवार्य आहे.
(३) काही अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थ्याची ८०% उपस्थिती नसल्यास विद्यापीठाच्या वैधानिक सामित्याद्वारे निश्चित करण्यात आलेले शुल्क भरून विद्यार्थ्याला त्या त्या सत्रातील कृती पूर्ण कराव्या लागतील.
(४) क्षेत्रीय कार्य आणि आंतरवासिता हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण असणे अनिवार्य आहे.
६. संकीर्ण माहिती / सूचना
एम.ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमास प्रवेश घेतल्यानंतर खालील विशेष बाबी लक्षात ठेवाव्यात.
१. एकदा प्रवेश घेतल्यानंतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही या या संदर्भातील पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. तथापि, शिक्षणक्रम सुरू असताना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यापुढील आवश्यक कागद पत्रांची त्याच्या वारसाने पूर्तता केल्यास प्रशासकीय खर्च वजा करून ७५% शुल्क परत करण्यात येईल. शुल्क परत करताना (१) मृत्यूच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत (२) रु. २० च्या स्टँपपेपरवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष प्रमाणित केलेले वारसाचे ना हरकत दर्शविणारे मूळ शपथपत्र (३) शुल्क भरल्याची मूळ पावती (४) अध्ययन साहित्य. विद्यापीठास सादर करावे लागेल.
२. विद्यापीठास पत्र पाठविताना कायम नोंदणी क्रमांक व तुकडीचा, अभ्यास केंद्राचे नाव व संकेतांक यांचा उल्लेख नमूद करणे आवश्यक आहे.
३. विद्यार्थ्यास विद्यापीठाने माहितीपुस्तिकेत नमूद केलेल्या अटी व शर्ती प्रवेशासाठी लागू राहतीलच, परंतु या व्यतिरिक्त विद्यापीठाने वेळोवेळी तयार केलेले नियमही बंधनकारक राहतील.
४. NEP 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्याने पदव्युत्तर पदवीतील प्रथम वर्शातीला सर्व कृती यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्याला बाहेर पडावयाचे असल्यास त्याला शिक्षणशस्त्र पदव्युत्तर पदविका देण्यात येईल त्याचा संकेतांक PGD8EDU Post Graduate Diploma in Education असा असेल.
संपर्कसत्रे उपस्थिती माहिती
मुक्त विद्यापीठाचा शिक्षणक्रम प्राधान्याने स्वयं-अध्ययनावर आधारित असला तरी हा व्यावसायिक शिक्षणक्रम असल्यामुळे संमंत्रण, स्वाध्याय सादरीकरण, संशोधन मार्गदर्शन, कृतिसत्रे आणि परिसंवाद, इत्यादींसाठी संपर्कसत्रांची आवश्यकता असते. संपर्कसत्रातील उपस्थिती व सहभाग हा अत्यावश्यक व अनिवार्य आहे. संपर्कसत्रांचे आयोजन सामान्यतः सुट्यांमध्ये केले जाते. सुट्यांव्यतिरिक्त छोट्या संपर्कसत्रांचे आयोजन अभ्यासकेंद्राने केल्यास अशा संपर्कसत्रांसाठी विद्यार्थ्यांना सेवेतून रजा घेऊन उपस्थित राहावेच लागेल. त्याबद्दल कोणतीही तक्रार विद्यापीठ मान्य करणार नाही.
दोन वर्षांत एकूण 30 दिवसांचे संपर्कसत्र घेण्यात येईल. त्यातील 2 दिवसांचे उद्बोधन सत्र व उर्वरित 28 दिवसांचे संपर्कसत्र अभ्यास केंद्रावर घेण्यात येईल. संपर्कसत्राबाबतचा सविस्तर तपशील अभ्यास केंद्रामार्फत देण्यात येईल. विद्यार्थी मार्गदर्शिकेतही देण्यात येईल.
सेवानिहाय शुल्क
सेवानिहाय शुल्कविद्यापीठाच्या नवीन धोरणानुसार सेवानिहाय शुल्क आकारणी झालेली आहे. परीक्षा, गुणपत्रक, उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन यांसारख्या बाबींचा त्यात समावेश आहे. सदर शुल्क खालीलप्रमाणे आहे.
Send B.ed of information.
I am genuinely thankful to the owner of this website for sharing his brilliant ideas. I can see how much you’ve helped everybody who comes across your page. By the way, here is my webpage FQ5 about Airport Transfer.