वर्ग 5 शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका सन 2018 pdf scolarship exam
प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:
(1) या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग आहेत. त्यापैकी विभाग मध्ये प्रथम भाषा विषयासाठी 1 ते 25 व विभाग II मध्ये गणित विषयासाठी 26 cong75 असे एकूण 75 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
प्रश्नपत्रिका pdf येथे पहा
👉pdf download
(2) प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत.
(3) प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एकूण 90 मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
(4) उत्तरे नोंदविण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रश्नक्रमांकासमोर चार पर्यायासाठी क्रमागत वर्तुळे दिलेली
आहेत. त्यातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ पुढील उदाहरणात दाखविल्याप्रमाणे रंगवा.
उदा. प्रश्न क्र. 6 च्या बरोबर उत्तराचा पर्याय क्र. 2 असेल, तर तो पुढीलप्रमाणे नोंदवावा.
प्रश्न क्र. 6
(5) खालीलप्रमाणे नोंदविलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. असे उत्तर नोंदविल्यास त्या प्रश्नास ‘शून्य’ गुण दिले जातील.
(6) पर्यायाची उत्तरे नोंदविताना फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचाच वापर करावा. पेन्सिलने नोंदविलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
(7) एकदा नोंदविलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाहीत.
(8) प्रत्येक प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, खाडाखोड करून नोंदविलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
(9) प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली व शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा आहे, तेथेच कच्चे काम करावे.
(10) परीक्षेस मर्यादित वेळ असल्याने एखादया प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसल्यास पुढील प्रश्न सोडवा. शेवटी वेळ शिल्लक राहिल्यास उरलेल्या प्रश्नांसाठी पुन्हा प्रयत्न करा.
(11) एखाद्या प्रश्नात त्रुटी/चूक आढळल्यास त्याबाबत पर्यवेक्षक किंवा परीक्षा केंद्रसंचालक यांच्याकडे विचारणा करू नये.
(12) प्रश्नातील त्रुटी/चूक/आक्षेपाबाबतचे निवेदन शाळेने किंवा पालकांनी गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात न पाठवता संबंधित शाळेच्या लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीनेच पाठवावे,
(13) त्रुटी/चूक/आक्षेपाबाबतचे निवेदन ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याची मुदत परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध झाल्यापासून 10 (दहा) दिवसांपर्यंत राहील.
(14) मुद्रणदोष किंवा अन्य कारणांमुळे प्रश्न चुकीचा असल्याचे आढळल्यास तज्ञ समितीच्या अभिप्रायानुसार तो रद्द केला जाईल.
(15) मुळ माध्यमासोबत इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका दिलेली आहे. मूळ माध्यमातील संदिग्ध प्रश्नांबाबत इंग्रजी प्रश्न पहावेत.
1 thought on “वर्ग 5 शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका सन 2018 pdf scolarship exam ”