प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवाल शासन निर्णय pdf annual school inspection report 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवाल शासन निर्णय pdf annual school inspection report 

प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवाल शासन निर्णय सुधारीत प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवालानुसार सन २०१२-१३ मध्ये शाळा वार्षिक तपासणी करणेबाबत..

संदर्भ

:- १) या कार्यालयाचे पत्र क्रः मराशैसंप्रप शा.वा.त.अ.प्र/२०१२/३१४३ दि.३०/१०/२०१२

२) या कार्यालयाचे पत्र क्रःमराशैसंप्रप/शा.वा.त.अ.प्र/२०१२-१३/३१८३ दि.१/११/२०१२ च क्र.३३३३ दिनांक २३.११.२०१२

३) या कार्यालयाचे पत्र क्रः मराशैसंप्रप/शा.वा.त.अ.प्र/२०१२-१३/३५२४ दि.०५.१२.२०१२

उपरोक्त विषयान्वये संदर्भ पत्र १ अन्वये परिषदेने तयार केलेल्या सुधारीत वार्षिक तपासणी अहवालानुसारच सन २०१२-१३ मध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळातील इ.१ली ते ८वी च्या वर्गाची वार्षिक तपासणी करण्यात यावी व त्यादृष्टीने आपल्या स्तरावरुन सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांना आपल्या स्तरावरुन योग्य ते आदेश निर्गमित करण्याबाबत कळवण्यात आले होते.

संदर्भ २ च्या पत्रान्वये राज्यस्तरीय प्रशिक्षण दिनांक २२/११/२०१२ रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात प्रार्थामक शाळा वार्षिक तपासणी अहवालाच्या चाचणीप्रतीवर सविस्तर गटचर्चा करुन क्षेत्रिय अधिका-यांचे अभिप्राय घेण्यात आले होते. संबंधितांच्या अभिप्रायांचा विचार करुन प्रार्थामक शाळा वार्षिक तपासणी अहवाल अंतिम

करण्यात आला आहे. संदर्भ ३ च्या पत्रान्वये सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.) यांना सोबत जोडलेल्या प्रार्थामक शाळा वार्षिक तपासणी अहवालाची प्रत (pdf. फाईल) देवून दिनांक १५.१२.२०१२ रोजी तपासणी अधिका-यांचे प्रशिक्षण आयोजित

करणेबाबत कळविण्यात आले होते.

सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून इ.१ली ते ८वी चे वर्ग असणा-या प्रार्थामक / माध्यमिक शाळांच्या वार्षिक तपासणीसाठी सोबत दिलेल्या प्राथमिक शाळा वार्षिक तपासणी अहवालानुसारच सर्व शाळांची तपासणी कराबो. याबाबत आपल्या स्तरावरुन आपल्या अधिनस्थ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश निर्गमित व्हावेत ही विनंती

शासन निर्णय येथे पहा

👉pdf download

 

Leave a Comment