जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व थकीत देयक वेतन अनुदाने तरतुद २०२४-२५ payments granted

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व थकीत देयक वेतन अनुदाने तरतुद २०२४-२५ payments granted 

वेतन अनुदान तरतूद विनियोजन  (लेखानुदान) अधिनियम २०२४-२५ payments granted

जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने.

संदर्भः- १) शालेय शिक्षण व किडा विभाग शासन पत्र क्रमांक अनुवि४९२४/(३५/२४) अर्थसंकल्प, दिनांक ०३/०४/२०२४.

२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क. अंदाज-१८२/२४-२०५/ अनुदान वितरण/२४२८ दिनांक ०३/०४/२०२४

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे मे, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.

उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.

अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.

आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्राल नियमितपणे सादर करावा.

इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रमाक ५नियम ३९ (ब) टिप-५ तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.

वितरीत केलेल्या तरतूदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे, इतर कोणतेही देयके अदा करू नये. वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment