पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात (टप्पा-२) प्रसिद्धीपत्रक pavitra portal shikshak bharti
प्रसिद्धी दिनांक:
1 अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
2 इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
3. इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
4 इ.6 वी ते इ. 8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5 इ.6 वी ते इ. 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 22
6 इ.6 वी ते इ. 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शाख यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Pha
7 इ. 1 ली ते 8 वी/इ.9वी ते 12 वी/ अध्यापक विद्यालय या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. 2024
8 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये ” उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.
9 व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.
10 व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.
11 व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
12 उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या दोन विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (किमान द्वितीय श्रेणीमध्ये) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
13 जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
14 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, दि. २६/०२/२०२४ अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या आरक्षणाची कार्यपध्दती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र. ३४६८/२०२४ तसेच त्याअनुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, by पालव,
Approved