पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीकरिता उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेबाबत pavitra portal shikshak bharti
पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीकरिता उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत.
संदर्भ :- आपले पत्र क्र. आस्था-क/प्राथ १०६/प.भ-द.म./२०२५/२१९, दि.१५.०१.२०२५.
महोदय,
आपण सादर केलेल्या संदर्भाधीन प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ मधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे. त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्या-टप्प्यामध्ये केली जात असली तरी, ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने, तसेच पहिल्या टप्प्यातील १० टक्के रिक्त जागा, अपात्र, गैरहजर या जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने, ही भरती प्रक्रिया सुरु झाली त्यावेळी जे निकष उमदेवारांच्या कमाल वयोमर्यादेसंदर्भात लागू होते, तेच निकष या चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधरे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेस लागू राहतील. सबब, पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांचा आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरु होईपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ च्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या शिक्षकभरतीच्या टप्प्यांसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दि.१६.१०.२०२३ या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवारांचे वय ग्राह्य धरणे नियमोचित आहे. यासंदर्भात शासन निर्णय, दि.१०.११.२०२२ मधील तरतूदी व आपला उपरोक्त दि.१५.०१.२०२५ चा संदर्भाधिन प्रस्ताव विचारात घेता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी- २०२२ मधील गुणांच्या आधारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसन्या टप्प्यातील भरतीसाठी, आपल्या अभिप्रायानुसार, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ मधील गुणांच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनांनी प्रसिध्द केलेल्या जाहिराती संदर्भात निश्चित केलेल्या दि.१६.१०.२०२३ या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात यावे. त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, ही विनंती.