पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak bharti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak bharti 

संदर्भ :

१. शासन पत्र क्र. संकीर्ण- २०२४/प्र.क्र.६६१/टिएनटि-१, दि.१०.०९.२०२४

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.५६७१, दि.१३.०९.२०२४

३. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२४२/टिएनटि-१, दि.१४.०१.२०२५

४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७२९६, दि.२९.११.२०२३

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टण्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दि.१०.११.२०२२ नुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे. संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णय दि.१४.०१.२०२५ नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दि. २० जानेवारी, २०२५ रोजी सुरु करण्यात येणार आहे.

शासन पत्र दि.१०.०९.२०२४ अन्वये दुसऱ्या टप्यातील जिल्हा परिषदेकडी उर्वरित १० टक्के रिक्त पदे, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदबार, तेसच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा, इ. बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे. त्यानुसार आपणांस दुसऱ्या टप्यातील पदभरती करिता या कार्यालयाचे पत्र दि.१३.०९.२०२४ अन्वये पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच, जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचे कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी.

शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधिनस्त सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदुनामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दि.२९.११.२०२३ नुसार यापूर्वीच सविस्तर सूचनांद्वारे कळविण्यात आले आहे. पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावयाची असल्याने आपल्या अधिनस्त सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात. याबाबत आपणांस दि.१०.०१.२०२५ रोजी संस्थांची विभाग निहाय Excel Sheet पाठविण्यात आली आहे. सदर Excel Sheet अद्ययावत करावी व ज्या संस्थांद्री बिंदुनामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदुनामावली तपासणीची कार्यवाही करावी. बिंदुनामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करुन सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदुनामावली अ करुन रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करावी