पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत pavitra portal shikshak bharti
प्रेस नोट
दि. ३१/०३/२०२५
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत.
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक २०/०१/२०२५ रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे.
दिनांक २०/०१/२०२५ ते ३१/०३/२०२५ पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे. अद्यापही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक १५/०४/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait२०२२.mahateacherecruitment.org.in संकेतस्थळावर भेट द्यावी. या
शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.