पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता pavitra portal shikshak bharti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता pavitra portal shikshak bharti

प्रस्तावना:-

संदर्भ क्र. २ येथील शासन पत्रान्वये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीबाबतच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयाने संदर्भ क्र. ३ अन्वये सदर कामासाठी Anthology International Private Ltd. या सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली असून, या संस्थेशी करार करण्यास मान्यता देण्याबाबतचा तसेच संस्थेने नोंदविलेला दर रु. ७४.३४ लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. पदभरतीची तातडी असल्याने आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने Anthology International Private Ltd. या संस्थेशी एक वर्ष कालावधीचा करार केला व कामकाजास सुरुवात केली. या रकमेत पोर्टलचे विकसन, निर्मिती , बदल, कार्यान्वयन, देखभाल, मदत कक्ष, परवाना शुल्क इ. सर्व बाबींचा समावेश होता. दरम्यानच्या कालावधीत Anthology International Pvt. Ltd व Talisma Corporation Private Limited या दोन संस्थांमध्ये Assignment and Employee Transfer Agreement हा करार करण्यात आला व जून २०२४ पासून पवित्र पोर्टलचे सर्व ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह Talisma Corporation Private Limited या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले. पदभरतीच्या एकूण कामकाजाच्या २० टक्के कामकाज Anthology International Pvt. Ltd या संस्थेने तर उर्वरित ८० टक्के कामकाज Talisma

Corporation Private Limited या कंपनीने पूर्ण केले आहे. Anthology International Pvt. Ltd या कंपनीने त्यांनी केलेल्या कामापोटी रु. १८,५८,५००/- इतक्या रकमेचे देयक आयुक्त (शिक्षण) कार्यालयास सादर केले आहे. उर्वरित रु. ५५,७५,५००/- इतक्या रकमेचे देयक Talisma Corporation Private Limited यांचेकडून सादर होणे अपेक्षित आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यातील भरतीचे काम अचुकपणे, वेळेवर व कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय पूर्ण केल्यामुळे पहिल्या टप्प्यात १९,९८६ इतक्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करता आली. पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुषंगाने कंपनीने केलेले काम, कंपनीशी झालेला करारनामा व यासाठी झालेला खर्च यास कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्र. ४ अन्वये शिक्षक पदभरतीचा दूसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी विविध शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधी यांचेमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्यात Talisma Corporation Private Limited या कंपनीने उत्कृष्टरित्या पार पाडलेले कामकाज विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहीरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देणेबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र. ५ अन्वये शासनास सादर केला आहे. तसेच या कंपनीने वाटाघाटी अंती पहिल्या टप्प्यापेक्षा कमी खर्चात म्हणजे रु. ६८,८४,१२०/- (१८ टक्के जीएसटी सह) इतक्या रकमेत काम करण्यास सहमती दर्शविली असल्याचे देखील सदर पत्रान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

उपरोक्त दोन प्रस्तावांवर चर्चा करुन निर्णय घेण्याकरीता ई-गव्हर्नस धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गठीत केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक दि.२६.१२.२०२४ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीत या दोन्ही प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्तावांतर्गत कामासाठी प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे:-

31) Anthology International Pvt. Ltd या संस्थेशी आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने एक वर्ष

कालावधीचा केलेला करार

)Anthology International Pvt. Ltd या संस्थेने पूर्ण केलेल्या २० टक्के कामकाजाच्या

अनुषंगाने रु. १८,५८,५००/- (अक्षरी रुपये अठरा लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे फक्त) इतका खर्च,

क) Talisma Corporation Private Limited या संस्थेने पूर्ण केलेल्या ८० टक्के कामकाजाच्या अनुषंगाने रु. ५५,७५,५००/- (अक्षरी रुपये पंचावन्न लक्ष पंचाहत्तर हजार पाचशे फक्त) इतका खर्च.

०२. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दूसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी Talisma Corporation Private Limited या संस्थेस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहीरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च रु. ६८,८४,१२०/- (अक्षरी रुपये अडूसष्ठ लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस फक्त) यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर संस्थेशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर सर्व अनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी.

०३. या प्रित्यर्थ झालेला व होणारा खर्च मागणी क्रमांक ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ८०- सर्वसाधारण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (५१) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (२२०२ एच४५४) ३१ सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखालील संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक, (लेखा) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

०४. प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या व येणाऱ्या देयकांची छाननी करुन त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येऊ नयेत.

०५. सदर शासन निर्णय संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व संदर्भ क्र. ६ अन्वये सदर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०११४१५०७१७१२२१ असा आहे. सदरचा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Join Now