पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत pavitra portal second tappa
प्रेस नोट
दि. ०६/०२/२०२५
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२)
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी १,६३,०६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत.
“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
आता टप्पा २ अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Publish) करण्यासाठी दिनांक २०/०१/२०२५ पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी, पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in संकेतस्थळावर भेट द्यावी. या
सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.