पवित्र पोर्टल अंतर्गत निवड झालेल्या शिक्षकांचे पदस्थापना साठी समुपदेशन pavitra portal recruitment
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ? o ? मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये ‘पवित्र प्रणाली’ अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना देणेकामी हजर राहणे बाबत.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये जिल्हा परिषद नांदेडद्वारा शिक्षक पदभरती-2022 करीता पवित्र पोर्टलवर दिलेल्या पदांचे जाहीरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर मराठी माध्यमाच्या 202 व उर्दू माध्यमाच्या 6 उमेदवारांची गुणवत्ता यादी दिनांक 25/2 / 2024 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. नांदेड यांच्या पवित्र पोर्टल 2022 च्या लॉगिनला ऑनलाईन प्राप्त झालेली आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद नांदेड करीता विकल्प दिलेल्या पवित्र पोर्टलवर प्रसिध्द गुणवत्ता यादीतील उमेदवारांची सदर यादीतील अनुक्रमांकानुसार संदर्भ क्रं 10 नुसार दिनांक 4/3 / 2024 ते 5/3 / 2024 या कालावधीत पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहीती व त्याअनुषंगाने अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार मुळ कागदपत्राचे तपासणी करण्यात आलेली आहेत.
त्यानुसार सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी शासननिर्णय दिनांक 21 जुन 2023 नुसार व मा. आयुक्त कार्यालयाचे दिनांक 25.2.2024 चे पत्रानुसार समुपदेशनाने पदस्थापना देणे कामी कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे दि. १०-०३-२०२४ रोजी सर्व मुळ कागदपत्रांसह सकाळी 10.00 वाजता हजर रहावे. सदर दिवशी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड यांच्या स्तरावरुन परस्पर पदस्थापना देण्यात येईल या बाबत नोंद घ्यावी.