पवित्र पोर्टल शिक्षक भरती बाबत उमेदवारांसाठी प्रमाणपत्र नोंद करणे व प्रमाणपत्रांमध्ये दुरुस्त्या करणेबाबत pavitra portal certificate
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे । पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या
करण्याबाबतच्या सूचना (दुसरा टप्पा) (TAIT २०२२)
दिनांक : १२/०३/२०२५
पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत / स्व-प्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक १०/०३/२०२५ रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे.
৭) ज्या उमेदवारांना त्यांच्या स्व-प्रमाणपत्रांमध्ये कोणतीही दुरुस्ती करावयाची नाही, त्यांनी आता स्व-प्रमाणपत्र अप्रमाणित (Un certify) करणे आवश्यक नाही, म्हणजेच अशा उमेदवारांनी स्व प्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये. उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्व-प्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे.
२) मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) या प्रवर्गाशी संबंधित आहेत, अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक १०/०३/२०२५ रोजीच्या सूचना क्रमांक १४ ते १६ मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात (SEBC) मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही. सबब, अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवड करून स्व-प्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
३) सद्यःस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित (Un certify) केले असल्यास, स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) करणे अनिवार्य आहे, अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.