शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 री ते 8 वी गुणदानाबाबत सूचना PAT sankalit guide 2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 री ते 8 वी मार्गदर्शिका व गुणदानाबाबत सूचना pat sanklit guide 2024

खालील प्रमाणे शिक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत

‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन

चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल. राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात दुद्वितीय सत्राअखेर इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन २ घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विद्याथ्र्यांनी संबंधित इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

चाचणीचे स्वरूप : शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तींचे विकसन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक ही अध्ययन निष्पत्तींच्या आधारे तपासली जाणार आहे. या पुढील काळात होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणे व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणे ही अध्ययन निष्पत्तींवर आधारित असणार आहेत, त्यामुळे संकलित मूल्यमापन २ साठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत.

तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना : १) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्डे, वाक्यकार्डे, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.

२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा.

३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.

४) वयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.

५) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.

६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.

लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना :

१) इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचून दाखवावा, काय करावयाचे आहे, हे समजावून सांगावे व तो प्रश्न सोडवायला

सांगावा. याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडवून घ्यावी. २) इ. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना प्रश्न समजावून सांगावा. मात्र उत्तराचा संकेत देऊ नये. ३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी. शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळली आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही.

४) लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे.

) संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यावयाची आहे व ती तपासावयाची आहे.

५ ६) प्रत्येक विद्यार्थ्यांची सद्यः स्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे, हे पाहणे हा मुख्य उद्देश चाचणी घेण्यामागे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

७) प्रात्यक्षिक/तोंडी आणि लेखी चाचणीचा गुणनोंदणी तक्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे. प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाची आहे. अर्धा गुण देऊ नये.

८) शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुरूप कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.

Leave a Comment