संकलित मूल्यमापन-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत PAT Mark’s recorded 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संकलित मूल्यमापन-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत PAT Mark’s recorded 

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५, दि.८ ऑगस्ट २०२३

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी-VSK/२०२३-२४/४३४५ दि.१३ सप्टेंबर २०२३

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /संकलित मूल्यमापन-२-VSK/२०२३-२४/२०२४ दि.८ एप्रिल २०२४

४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /संकलित मूल्यमापन-२-VSK/२०२३-२४/०२२०९ दि.२६ एप्रिल २०२४

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning AssessmentSystem नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-३) चेआयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चेआयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन २(PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु- ट्युबद्वारे देण्यातआलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटसंकलित मूल्यमापन २ (PAT-३)गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे

गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षणदि. १५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन २ (PAT-३)चे गुण दि.२६ एप्रिल २०२४ ते दि.५ मे २०२४पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता.

तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांनादि.१० मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हाशिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र जिल्हा समन्वयकम्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांनाविद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन – २(PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे, तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन – २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.ple/9ssWv4bu5QPC6XHA) प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही

करण्याबाबत सूचित करण्यात यावे.

यु-ट्यूब लाईव्ह लिंक‌ शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

https://youtube.com/live/xnnTpdMytxY?feature=share

शासन निर्णय येथे पहा pdf download 

PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5R1 QhbVl207qQgW5Zj6/view?usp=sharing संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक -२ (PAT-

3)https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7

PAT Mark's recorded 
PAT Mark’s recorded

 

Join Now

Leave a Comment