“पसायदान” संत ज्ञानेश्वर महाराज pasaydan sant Dnyaneshwar Maharaj 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“पसायदान” संत ज्ञानेश्वर महाराज pasaydan sant Dnyaneshwar Maharaj 

आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे ।

तोषोनि मज् द्यावे । पसायदान् हे ।।

जे खळांचि व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रति वाढो ।

भूता परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।

जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात् ।।

वर्षत् सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत् भूमंडळी । भेटतु भूता ।।

चला कल्पतरुंचे अरव् । चेतना चिंतामणीचे गाव् ।

बोलते जे अर्णव् । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन् । मार्तंड् जे तापहीन् ।

ते सर्वांही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।

भजीजो आदिपुरुखी । अखंडित् ।।

येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दान् पसावो ।

येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।

संत ज्ञानेश्वर

आरती संग्रह उपलब्ध डाउनलोड करून घ्या