परीक्षा पे चर्चा २०२४-२५ आयोजनाबाबत शासन परिपत्रक parikshape charcha discussion on exam
संदर्भ: सचिव, उच्चस्तर शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १४.१२.२०२४.
उपरोक्त विषयास अनुसरुन मा. श्री. नरेंद मोदी, पंतप्रधान भारत सरकार यांचा परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे. मागील सात वर्षामध्ये आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मा. पंतप्रधान विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थाचे ध्येय व स्वप्न पुर्ण करण्याकरीता मनोबल वृध्दिगंत करणार आहेत व परीक्षेची भिती कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याकरीता बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा https://innovateindia1.mygov.in/ या संकेतस्थळावर दिनांक १४.१२.२०२४ ते १४.०१.२०२५ या कालावधीत आयोजित केली आहे. यामध्ये इ. ६ वी ते इ.१२ वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच शिक्षक आणि पालक सहभागी होऊ शकतात. या परीक्षेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.
परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील पायऱ्या पहा
➡️प्रथम https://innovateindia1.mygov.in/ वर क्लिक कर
➡️ ‘Participate Now / सहभागी व्हा’ बटणावर क्लिक करा.
➡️ संपूर्ण नाव लिहा
➡️मोबाईल क्रमांक किंवा email ID लिहा
➡️ आलेला OTP लिहून नोंदणी करा
➡️ विद्यार्थ्याचा संपूर्ण माहिती तपशील भरा
➡️शाळेचा संपूर्ण माहिती तपशील भरा
➡️ यामध्ये आलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे लिहा
➡️पंतप्रधानाना 500 शब्दांचा प्रश्न विचारा
➡️ यामध्ये स्पर्धा इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात .
➡️ जास्तीत जास्त 500 अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न मा पंतप्रधानांना सादर करावा.
➡️ पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये उपरोक्त परीक्षेव्दारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेकडून विचारण्यात आलेल्या निवडक प्रश्नचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षीच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये ज्या प्रश्नाचा समावेश केला होता, त्या प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना प्रसार माध्यमासोबतच्या चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे.
तसेच परीक्षेविषयीची भिती कमी करुन यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प, मॉडुयल या विषयक प्रबंध सादर करणाऱ्या निवडक दहा शिक्षक विदयार्थी यांची एक्झाम वॉरीयर म्हणून निवड करण्यात येणार असून त्यांना मा. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
2. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आवश्यक ती प्रसिध्दी आपले कार्यालये व शाळांमध्ये करण्यात यावे.
3. तसेच परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या कार्यक्रमाव्दारे झालेल्या फलनिष्पतीबाबतची माहिती सर्व विदयार्थी व पालक यांना देण्यात यावी.
4. सदर कार्यक्रमाची प्रसिध्दी सर्व शाळांच्या प्रसार माध्यम आणि #PPC२०२५ यावर पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडीओ (posters/creatives/Videos) तयार करून प्रसिध्द्र करण्यात यावी. यामधील निवडक पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडीओ MyGov या संकेतस्थळावर समावेश करण्यात येणार आहेत.
परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑनलाईन अधिकृत लिंक येथे पहा
5. सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व शाळा प्रमुखांची बैठक घेवून सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना सहभाग घेण्याकरीता प्रवृत्त करण्यात यावे.