परीक्षा पे चर्चा-2025 विदयार्थी, पालक व शिक्षक यांचा उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदविणेबाबत pariksha pe charcha participate
दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजीच्या परीक्षा पे चर्चा-२०२५ या थेट प्रसारीत होणार कार्यक्रमात विदयार्थी, पालक व शिक्षक यांचा उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदविणेबाबत
लिंक- https://www.youtube.com/watch?v=G5UhdwmEEls
संदर्भ :-
१.मा.शिक्षण सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय म.रा.पुणे यांचे पत्र
क्र. शिसं/उमा/परीक्षापेचर्चा-८/कार्यासन-ए-१/१६० दि.१०.०१.२०२५
२. या कार्यालयाचे पत्र क्र. शिउसं/विदया-अ/३८४/२०२५ दि.१६.०१.२०२५
३. मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.०७.०२.२०२५ रोजीच्या व्ही.सी. मधील सुचना
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पत्रातील व व्ही.सी.तील निर्देशानुसार परीक्षा पे चर्चा-२०२५ या कार्यक्रमातर्गत विदयार्थी, पालक व शिक्षक यांना दिनांक १० फेब्रुवारी २०२५ या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोदवीने बाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत.
सदर कार्यक्रम दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता दुरदर्शन, डि.डि न्युज व खाजगी प्रसार माध्यम तसेच ऑल इडीया रेडीओ तसेच युट्युब इत्यादी माध्यमावर थेट प्रसारीत होणार आहे तसेच या सोबत दिलेल्या लिंकवर पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी दिलेली आहे
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळामध्ये प्रसार व प्रचार करण्यात यावा. तसेच आपल्या अधिनस्त सर्व खाजगी अनुदानित शाळा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा व राज्यातील इतर बोर्डाशी संलग्न शाळाचे विदयार्थी (सीबीएससी, आयसीएसई, केब्रिज इ) शाळेतील ६ वर्गापासुनच्या वरील वर्गातील विदयार्थी, शिक्षक व पालक यांनी जास्तीत जास्त सहभाग नोदविणे करीता व सदर कार्यक्रम पाहण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करुन सहभागी विदयार्थी, शिक्षक शाळा व पालक संख्या इत्यादीची माहिती उलट टपाली या कार्यालयास सादर करावी.