“सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत pardeshi scholarship yojana
प्रस्तावना:-
विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलामुलींना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शासन निर्णय, संदर्भ क्र.१ दिनांक ११.१०.२०१८ च्या तरतूदीनुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता शासन निर्णय, संदर्भ क्र.२ दिनांक १३.१०.२०२२ अन्वये ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२२-२३ करिता निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुणे विभागातील कु. प्रियांका राजेंद्र माळी विद्यार्थिनिची The Pennsylvania State University, USA या विद्यापीठात Agricultural and Biological Engineering या ३ वर्षाच्या Ph.D अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
कु. प्रियांका राजेंद्र माळी या विद्यार्थिनीस प्रथम वर्षातील प्रथम व द्वितीय सत्राकरिता शासनाचे ज्ञापन, संदर्भ क्र.३ दिनांक १३.०३.२०२३ अन्वये रु.४०,००,०००/- व संदर्भ क्र.४ दिनांक २८.०३.२०२३ अन्वये रु.४,७४,६४७/-अशी एकूण रु.४४,७४,६४७/- इतकी रक्कम प्रथम वर्षाकरिता तसेच संदर्भीय शासन निर्णय क्र.५ दि. १७/१०/२०२४ च्या शासन निर्णयान्वये व्दितीय वर्षातील प्रथम सत्राकरिता शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता व आरोग्य विम्यापोटी रू. २४,८९.५७४/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
सदयस्थितीत कु. प्रियांका राजेंद्र गाळी या विद्यार्थिनीने परदेशातील शैक्षणिक कालावधीच्या द्वितीय वर्षातील द्वितीय सत्राकरिता रु.२०,८७,४१७/- इतकी शिष्यवृत्ती मिळणेबाबत मागणी केली आहे. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांनी संदर्भ क्र.६ च्या पत्रान्वये प्रचलित शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कु. प्रियांका यांना द्वितीय वर्षातील द्वितीय सत्राच्या शिष्यवृत्तीसाठी एकूण रु.२०,८७,४१७/- (अक्षरी रुपये वीस लक्ष सत्याऐंशी हजार चारशे सतरा फक्त) इतका निधी वितरीत करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. यास्तव, सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय क्रमांका शिवृत्ती-२०२४/प्र.क्र.०६/शिक्षण-२
शासन निर्णय :-
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुणे विभागातील कु. प्रियांका राजेंद्र माळी या विद्यार्थिनीस परदेशातील अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षातील द्वितीय सत्राकरिता उक्त योजनेतील तरतुदीनुसार एकूण रक्कम रुपये २०,८७,४१७/-(अक्षरी रुपये वीस लक्ष सत्याऐंशी हजार चारशे सतरा फक्त) खालील तक्यातील तपशिलानुसार वितरीत
करण्यास याद्वारे मंजूरी देण्यात येत आहे:-
२. उपरोक्तप्रमाणे निधी वितरणासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
नियंत्रक अधिकारी तथा संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी उपरोक्त प्रमाणे वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीच्या मर्यादेत्त विहित प्रयोजनासाठी खर्च करावा. निधी खर्च झाल्यावर खर्चाचे विवरण (जिल्हा निहाय/लाभार्थी संख्या) व उपयोगिता प्रमाणपत्र न चूकता शासनास सादर करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी तथा संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.
३. उपरोक्त निधी सदर विद्यार्थ्यास वितरीत करत असताना विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या निधी मागणीचा प्रस्ताव तपासून, विद्यापिठाची कागदपत्र पडताळणी करुन, सदर निधी ज्या विद्यार्थ्याकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच विद्यार्थ्याकरिता खर्ची पडेल तसेच, परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत शासन निर्णय, संदर्भ क्र. १ दि. ११.१०.२०१८ व शासन शुद्धिपत्रक दि. २४.०१.२०२३ व दि.१६.०३.२०२३ मधील अटी व शर्तीची पुर्तता करुन संबंधित विद्यार्थ्यांचे निधी मागणीचे प्रस्ताव तपासून निधी मंजूर करण्याबाबतची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.
४. सदर निधी खर्च करतांना वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका तसेच वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/परिपत्रकातील अटी व शर्तीचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.