प्राथमिक पदवीधर शिक्षकांना बीएससी उत्तीर्ण केल्याने, शेर्भाणक व व्यवसायिक अर्हतेत सुधारणा केल्याने विज्ञान/गणित विषय संवर्गात समावेश/रूपांतरण करणेसाठी मार्गदर्शन मिळणेबाबत padvidhar shikshak
संदर्भ- १. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जिल्हा परिषद, बीड यांचे पत्र क्र.६३७/दि.३/२/२०२५ २. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक दि.१३-१०-२०१६
उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद, बीड शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत ७४ प्राथमिक पदवीधर शिक्षक हे भाषा/सामाजिकशास्त्रे विषय संवर्गात प्राथमिक पदवीधर शिक्षक असून यांनी त्यांचे दि.२९/७/२०२४,दि.२७/८/२०२४ व दि.९/९/२०२४ रोजीच्या निवेदनाव्दारे सेवातर्गत मान्यता प्राप्त मुक्त विदयापीठातून बीएससी/एमएससी पदवी उत्तीर्ण केली असल्याने विज्ञान व गणित विषय संवर्गात प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून रूपांतर/ समावेश करण्याबाबतची विनंती आपणांस केलेली आहे.
जिल्हा परीषद, बोड शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत भाषा व सामाजिक शास्वातील ७४ प्राथमिक पदवीधर शिक्षक यांनी मान्यता प्राप्त मुक्त विदयापीठातून बीएससी/एमएससी पदवी उत्तीर्ण केली असल्याने/प्रकरणपरत्वे प्रशिक्षित शिक्षकासाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली असल्याने, सामाजिक शास्त्रे विषय संवर्गातील अतिरिक्त ठरत असलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे समायोजन होण्याच्या दृष्टिने तसेच आपल्या विभागातील विज्ञान/गणित विषय संवर्गाचे प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने विदयार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून शासन निर्णय दि.१३-१०-२०१६ मधील परिच्छेद ६ व महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि.२४-३-२०२३ मधील (दोन) टीप (श्क) नुसार संबंधितांचे पदस्थापनेत बदल न करता, मंजूर पदांच्या अधीन राहून संबंधित सामाजिक शास्त्रातील ७४ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना भाषा/सामाजिकशास्त्रे विषय संवर्गातुन विज्ञान/गणित संवर्गात समावेश करणेबाबतची धारणा आहे असे आपण संदर्भ क्र.१ नुसार कळविले आहे. तरी संचालनालय स्तरावरून आपली धारणा पक्की करण्यात येत आहे.