जिल्हांतर्गत बदलीसाठी शिक्षकांकडून फसवेगीरी? बोगसगिरी करणाऱ्यांना झटका; झेडपीचे २६ शिक्षक निलंबित ott teacher transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हांतर्गत बदलीसाठी शिक्षकांकडून फसवेगीरी? बोगसगिरी करणाऱ्यांना झटका; झेडपीचे २६ शिक्षक निलंबित ott teacher transfer portal

जिल्हांतर्गत बदलीसाठी शिक्षकांकडून फसवेगीरी? बोगसगिरी करणाऱ्यांना झटका; झेडपीचे २६ शिक्षक निलंबित

बीड: प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत

बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याऱ्या शिक्षकांची फेर वैद्यकिय तपासणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात ५२ तर दूसऱ्या टप्प्यात २६ शिक्षकांचा तफावतीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. आठ दिवसांपुर्वी ५२ शिक्षक निलंबित करण्यात आल्यानंतर बुधवार दि.१ फेब्रुवारी रोजी २६ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सर्वात आधी ‘पुण्यनगरी’ हा विषय उजेडात आणला होता.

दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संशय आल्यानंतर २३६ शिक्षकांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील बोर्डाकडे पुनर्रतपासणीसाठी पाठविले होते. यात पहिल्या टाण्प्यात ५२ शिक्षकांच्या वैद्यकिय तपासणीत तफावत आली तर दूसऱ्या टप्प्यात २६ शिक्षकांच्या वैद्यकिय तपासणीत तफावत आलेली आहे. दि.२३ जानेवारी रोजी ५२ शिक्षकांना निलंबित करण्यात आले तर दि.१ फेब्रुवारी रोजी २६ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, अजून २३ शिक्षकांचे वैद्यकिय पुनर्रतपासणी अहवाल येणे बाकी आहे. एक दोन दिवसात हे अहवालही येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आत्ता मेंदूविकारच्या रूग्णांचे अहवाल राहिलेले आहेत. सदरील वैद्यकिय अधिकारी रजेवर असल्याने ते अहवाल आलेले नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.

या शिक्षकांचे निलंबन : हरिभाऊ गोरवे,

राहिमुद्दीन सय्यद, महेश नरवते, शितल जावळे जयराम मांगडे, पवनराज देशमूख, अप्पासाहेब भोसले, आशाबाई आडकर, स्वाती भोंडवे, अर्चना टाकणखार, विजय गर्जे, रखमाजी कोल्हे, रमेश डोरले, निर्मला सोळुंके, शंकर देवकते, गंगाधर कांबळे, अंगद घुले, संजय पडोळे, अब्दूलकरीम अब्दुलगफार कुरेशी प्रकाश भोसले, रामदास साबळे, अर्चना धोंडे, वनिता जाधव, परमेश्वर बिडवे, प्रियंका केदार, सुनिता गोडसे,

फोनाफोनीआधी सिईओंनी काढले आदेश

दरम्यान, दि.२३ जानेवारी रोजी ५२ शिक्षकांचे निलंबनाचे आदेश काढताना काही आमदारांनी मतदानाचा हिशोब करत शिक्षकांचा । बचाव करण्यासाठी पफोनाफोनी केली होती. तोच प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी सुनावणीच्या। रात्रीच आदेश तयार करून बुधवारी सकाळी शिक्षकांच्या हाती सोपविण्यात आले.

२३६ शिक्षकांची झाली वैद्यकिय तपासणी !

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत १५७२ शिक्षक पात्र होते. यातील ७७२ शिक्षकांनी दिव्यांग आणि आजारी असल्याचे ऑनलाईन अर्जात म्हटले । होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी सुनावणी घेवून यातील २३६ शिक्षकांची पुनर्रतपासणी करण्याचे आदेश दिले होते.

1

तालुकानिहाय शिक्षक : गेवराई-४. कंज-१।

माजलगाव-६. पाटोदा-४, शिरूर-२, वडवणी-३. आष्टी-१. परळी-४, बीड-१ शिक्षकांचा समावेश आहे. धारूर आणि अंबाजोगाई तालुक्यातील । शिक्षकांचा यात समावेश नाही.

बदली प्रक्रियेसाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत आढळलेली | आहे. असे प्रमाणपत्र देणे अतिशय चुकीचे असून ज्यांनी असा प्रकार केला आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे. यापुढे देखील चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करू श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, (प्रा.)

Join Now