नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत समग्र शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र व राज्य हिस्स्याचे प्रमाण ६०:४० open new navin lekhashirsha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत समग्र शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र व राज्य हिस्स्याचे प्रमाण ६०:४०  open new navin lekhashirsha 

संदर्भ :-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग नस्ती क्र. समग्र-२०२४/प्र.क्र.१०८/एसडी-१

प्रस्तावना:-

समग्र शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र व राज्य हिस्स्याचे प्रमाण ६०:४० असे आहे. मा. महालेखाकार कार्यालय, महाराष्ट्र, मुंबई यांनी सन २०२४-२५ करीता अर्थसंकल्पीय अंदाज (White Book) पुनर्विलोकन केले असून सहायक अनुदानेकरिता उप लेखाशिर्ष उघडण्यात न आल्याने MH १६०१ अंतर्गत नवीन उप लेखाशिर्ष उघडणेबाबत निर्देश दिले आहेत. सदर योजनेच्या अनुषंगाने जमा रकमेसाठी नवीन लेखाशिर्ष उडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार खालील प्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

१६०१ – केंद्र सरकारकडून सहायक अनुदाने,

०६ – केंद्र पुरस्कृत योजना,

१०१ – केंद्रीय सहाय्य / हिस्सा.

(११) – शालेय शिक्षण

(११) (०९) समग्र शिक्षा अभियान

(१६०१६५८२०१)

सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ सं.सं : ख.वि/चा-१/शालेय शिक्षण व क्रीडा विभाग/यूओआर-१५५/२०२४-२५/११०२, दि.१८/१०/२०२४ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १३५८/व्यय-५, दिनांक ०९/१२/२०२४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांका संकीर्ण २४१३/१८५/१३)/अर्थसंकल्प

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०११७१३०३४५८८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.