राज्यातील शिक्षक बदल्यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे मा.मंत्री महोदयांच्या बैठकीचे आयोजन online transfer portal meeting
मा. मंत्री, (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांनी खालील नमुद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावी, असे निर्देशित केले आहे
राज्यातील शिक्षण विभागाचे खालील प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक विषय खालील प्रमाणे
१. जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी ३१ मे ऐवजी ३० जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवावी.
. शा.नि. २०२२ मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या.
२ त्यामुळे २०२२ मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमतील शिक्षकांना २०२५ च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी.
३. आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकाची पुर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरुन त्यांची जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी. (पदोन्नतीसाठी पुर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते.)
४. आंतरजिल्हा बदलीपुर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी. (शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नतीसाठी)
५. आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संचमान्यतेनुसार रिक्त जागा कळावाव्या तसेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश आसावा.
६. आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या कोणल्याही अटीशिवाय कराव्यात रोस्टरचा विचार करु नये,
७. आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावी.
दिनांक: १७.०३.२०२५
वार: सोमवार
वेळ: दुपारी ०४.०० वा.
स्थळ: परिषद सभागृह, दालन क्र. ०५, सातवा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई.
बैठक आयोजित करणारा विभाग : ग्रामविकास व पंचायत राज
बैठकीकरीता निमंत्रितांची यादी
१. मा. श्री. राहुल (दादा) कुल (वि.स.स)
२. मा. श्री. सुरेश (अण्णा) धस (वि.स.स)
३. मा. श्री. सत्यजीत तांबे (वि.प.स)
४. मा. प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)
५. मा. प्रधान सचिव (शालेय शिक्षण)
६. उप सचिव/सह सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)
७. श्री तुषार महाजन, उप सचिव (शालेय शिक्षण)
८. श्री. बळवंत पाटील, (माजी अध्यक्ष, शिक्षक संघटना माजी) मौजे. दहिवडी ता. माणजि. सातारा.
९. विषयाशी संबधित इतर अधिकारी.
> उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागाने करावे व नमुद केल्याप्रमाणे सर्व संबधितांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे.
> सदर बैठकीस चहापान, व्यवस्था व कक्ष आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही विभागाने करावी.
> संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी या कार्यालयास दि. १३.०३.२०२५ रोजी (rddminister@gmail.com) या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावी तसेच ३ हार्ड कॉपी या कार्यालयास पाठविण्यात यावी.
> बैठकीस उपस्थित राहणाऱ्या निमंत्रित अधिकारी यांचे नांव, पदनाम, संपर्क क्र. ई बैठकीपूर्वी या कार्यालयास कळविण्यात यावी.
> बैठकीचे कामकाज हाताळणाऱ्या अधिकाऱ्याचा तसेच बैठकीचे इतिवृत्त घेणाऱ्या अधिकारी / लघुलेखक यांचा कार्यालयीन तसेच मोबाईल क्रमांक बैठकीच्या सुचना पत्रात न चुकता नमुद करावा.
> बैठक झाल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त मा. मंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी सात दिवसांत सा.प्र.वि. च्या शासन परिपत्रक क्र. सकीर्ण-२०१८/१२५/प्र.क्र२२/का-१८ (र.व.का.) दिनांक ४ जुन, २०१९ मधील नमुद निर्देशाप्रमाणे सादर करावे.
> सदर बैठकीच्या अनुषंगाने या कार्यालयातील श्री. सुर्यकांत सजगणे, स्वीय सहाय्यक, संपर्क क्र. (९८२२५३७०३१)
/ श्री. श्रीशैल शिंदे (९०७६३७२७८९) यांचेशी सपंर्क करावा.
Amicus