चुकीची माहिती भरून बदली प्रक्रियेत लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरूद्ध कारवाई प्रस्तावित online teacher transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चुकीची माहिती भरून बदली प्रक्रियेत लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरूद्ध कारवाई प्रस्तावित online teacher transfer portal 

ऑनलाईन बदली पोर्टल 2025 मधील माहिती भरताना खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे चाबत.

संदर्भ

– 1) शासन निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दि. 18 जून 2024

2) मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या सहविचार सभेतील सूचना,

3) मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचा आदेश क्रमांक-

जा. क्र./जिपसो/शिक्षण (प्राथ)/प्राशिनि/45/25

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना कळविण्यात येते की. ऑनलाईन बदली पोर्टलवरील माहिती भरत असताना खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी –

1. अधिसंख्य पद संदर्भ क्र. 1 व 2 नुसार शिक्षक बदलीपात्र ठरवत असताना शाळेवरील सेवा 5 वर्ष तसेच सोलापूर जिल्हा परिषदेकडील सलग सेवा 10 वर्ष होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिसंख्य पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची सोलापूर जिल्हा परिषदेकडील सलग सेवा 10 वर्षे होणे आवश्यक आहे. संदर्भ । मधील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.10 नुसार शिक्षकांनी कार्यवाहो करावो.

2. आपसी आंजिव शिक्षकांची सोलापूर जि. प. हजर दिनांक संदर्भ क्रमांक 3 मधील पत्रानुसार आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सोलापूर जिल्हा परिषदेतील हजर दिनांक हीच Current District Joining Date घेण्यात यावी.

3. एकाच शाळेवर पदोन्नती संदर्भ क्र. 2 नुसार त्याच शाळेत पदोन्नती घेतली असेल तर पदोन्नती पूर्वीच्या पदावरील त्या शाळेतील हजर दिनांक हीच Current School Joining Date घेण्यात यावी.

4. सर्व शिक्षकांनी आपली प्रोफाईल मधील माहिती तपासून पहावी. कोणीही नजरचुकीने अथवा जाणूनबुजून चुकीची माहिती भरलेली नाही याची खात्री करावी. चुकीची माहिती भरल्यास होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.

वरील सूचनांप्रमाणं तालुक्यातील सर्व शिक्षकांनी माहिती भरली असल्याची खात्री करावी, माहिती चुकीची असल्याची निदर्शनास आल्यास तात्काळ कार्यालयास कळवावी. कोणीही चुकीची माहिती भरू नये. चुकीची माहिती भरून बदली प्रक्रियेत लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी,

Join Now