जिल्हांतर्गत १८०० शिक्षकांच्या बदल्या निश्चित; यादी जाहीर बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित; पुढील टप्प्यात आंतरजिल्हा बदल्या online teacher transfer portal
अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हांतर्गत बदलीसाठी जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक शिक्षकांनी आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली होती. शासनाच्या बदली नियमानुसार ग्रामविकास विभागस्तरावर जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांपैकी १८०० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. बदलीपात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी
शासनाने जाहीर केली आहे. त्याचे संभाव्य वेळापत्रक शासनाने दिले असून, २८ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संवर्ग १ ते संवर्ग ४ आणि विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया फेरी होईल आणि नंतर अवघड क्षेत्रातील जागा भरण्यात येतील.
प्राथमिक शिक्षकांची बदलीच्या मागणीच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती सेवा, वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती ऑनलाईन सिस्टीममध्ये मागविण्यात आली होती.
शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना
दिल्या होत्या की, कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा भ्रामक माहिती दिल्याचे आढळून आल्यास संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीची विभागीय स्तरावर पडताळणी करण्यात आली असून, त्यानुसारच शासनाने बदलीपात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांची अंतिम यादी तयार केली असून, लवकरच ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया पुढे राबवली जाईल.