शिक्षकांच्या बदल्यांची तयारी सुरू ऑनलाईन डेटा झाला तयार; तीन वर्षे एकाच शाळेत असलेले शिक्षक यावेळी बदलीसाठी पात्र online teacher transfer portal
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने
शिक्षक बदली प्रक्रियेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीवरील काही आक्षेप निकाली काढण्यात आले तर काही आक्षेप अमान्य करण्यात आले. शिक्षकांच्या माहितीचा ऑनलाईन डेटा तयार झाला असून, बदलीपूर्व प्रक्रियेला वेग आला आहे.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळ अवघड अर्थात दुर्गम क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या सुगम भागातील शाळांवर बदल्या करण्यात येणार आहेत. नऊ तालुके मिळून जिल्हा परिषदेच्या एकूण २,३८४ शाळा असून, यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सुमारे सहा हजार शिक्षक
कार्यरत आहेत.
शासनाच्या नियमानुसार, ज्या नियमित शिक्षकांची तीन वर्षांची सेवा अवघड क्षेत्रात पूर्ण झाली, अशा शिक्षकांना साधारण अर्थातच सुगम क्षेत्रात सेवा देण्याची संधी उपलब्ध केली जाते. त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रक्रिया राबविली जाते.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तपासली शिक्षकांची माहिती
१.जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी शासनाच्या बदली प्रक्रियेच्या ऑनलाईन पोर्टलवर आपली संपूर्ण माहिती भरली आहे.
शिक्षकांनी पोर्टलवर भरलेली 3 माहिती संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तपासली
ज्यांच्या माहितीमध्ये चुका होत्या तसेच अपूर्ण होती, ती माहिती पूर्ण करून घेण्यात आली.
३.या पोर्टलद्वारे ऑनलाईन बदल्या करण्यात येणार आहेत. बदलीची सर्व प्रक्रिया ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.
९० शिक्षकांनी घेतले होते यादीवर आक्षेप
सुगम व अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीवर जवळपास २० शिक्षकांनी आक्षेप घेतले होते. या आक्षेपाचा प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने निपटारा करण्यात आला. काही आक्षेप स्वीकारण्यात आले तर काही आक्षेप शिक्षण विभागाकडून फेटाळून लावण्यात आले आहेत.
बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार होणार
बदली प्रक्रियेसाठी सर्व शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर बदली पात्र शिक्षकांची यादी तयार होणार आहे. या यादीवर आक्षेप आले तरी त्याचा निपटारा शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.