गुरुजी, बदली पाहिजे, तर जेजेचे प्रमाणपत्र आणा ! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिव्यांग शिक्षकांसाठी दिले निर्देश online teacher transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुरुजी, बदली पाहिजे, तर जेजेचे प्रमाणपत्र आणा ! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिव्यांग शिक्षकांसाठी दिले निर्देश online teacher transfer portal 

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्ह्यातील संवर्ग एकमधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी मुंबईच्या सर जेजे हॉस्पिटल मुंबई येथे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. त्यानुसार बदली पाहिजे तर संबंधित शिक्षकांना सर जेजे हॉस्पिटलमध्ये दिव्यांगत्वाची तपासणी करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य प्रवक्ते शेख अब्दुल रहीम यांनी शासनाकडे निवेदन पाठविले होते. जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्ह्यातील संवर्ग एकमधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जेजे हॉस्पिटल, मुंबई येथे करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार कार्यवाहीचा अहवाल शिक्षण विभागाला पाठविण्याचे निर्देश दिले.

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व मुद्द्यांबाबत नियमांचे काटेकोर पालन करावे व कोणत्याही शिक्षकांकडून चुकीची अथवा खोटी माहिती सादर केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व शासन निर्णयानुसार पुरावे घ्यावेत अशा सूचना शिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत. दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत बदली दरम्यान दिव्यांगत्व कमी असताना जास्त प्रमाणात दाखविल्याचे उघड झाले होते.

बदलीसाठी काय पण….

काही शिक्षक जिल्ह्यांतर्गत बदली • करून घेण्यासाठी किंवा बदली १ सूट लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, आजाराचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतात व कार्यालयास खोटी माहिती सादर करून खरे दिव्यांग शिक्षक तसेच आजारी शिक्षक व सर्वसामान्य शिक्षकांवर अन्याय करतात.

यासाठी संवर्ग एकमध्ये • बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची मुंबई येथील सर जेजे समूह रुग्णालयात दिव्यांगत्व किंवा आजाराबाबत वैद्यकीय तपासणी केलेली आहे का, याबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

खऱ्या शिक्षकांवरील अन्याय दूर होणार

खरे दिव्यांग किंवा आजारी शिक्षक व सर्वसामान्य आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सर्व संवर्ग एकमधील शिक्षकांची दिव्यांगत्व, आजाराबाबत पूर्ण वैद्यकीय तपासणी मुंबईच्या सर जेजे रुग्णालयातून भविष्यात होऊ शकते, याबाबत सर्व संबंधित शिक्षकांना अवगत करण्यात येत आहे.

किती शिक्षकांनी तपासणी केली?

अधिनस्त किती शिक्षकांनी दिव्यांगत्वाबाबत वैद्यकीय तपासणी मुंबईच्या सर जेजे समूह रुग्णालयातून दिव्यांगत्वाच्या प्रकार व टक्केवारीबाबत तपासणी केली आहे? त्यांच्या नावासह यादी व अहवाल सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Join Now