दि.21 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार संवर्ग १ व संवर्ग २ मधील शिक्षकांना सेवेची अट नसल्याबाबत online teacher transfer portal
जिल्हा परिषद शिक्षक जिल्हातंर्गत बदली विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांचा अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी 21 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णय
प्रस्तावना :-
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या त्यांच्या सोयीनुसार मानवी हस्तक्षेपविरहीत पारदर्शी जिल्हातंर्गत बदल्या करण्याकरिता दिनांक २७.२.२०१७ चा शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीवर करण्यात आल्या आहेत. या धोरणामध्ये शिक्षकांच्या बदल्या होण्याकरिता त्यांचे चार संवर्ग करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे आहेत.
१) विशेष संवर्ग भाग-१
२) विशेष संवर्ग भाग-२
३) बदली अधिकार प्राप्त शिक्षक
४) बदलीस पात्र शिक्षक
२. वरीलप्रमाणे जे चार संवर्ग निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये विशेष सवंर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग २ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना त्यांचे बदलीचे अर्ज भरण्यासाठी सेवेच्या कालावधीची अट नाही.
३. वरील संवर्गात मोडणाऱ्या विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ यामध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हातंर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवेची अट वा कालावधी विचारात घेतला जात नाही. म्हणुनच त्यांना विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ असा दर्जा दिलेला आहे. असे असतानाही काही जिल्हा परिषदांनी शिक्षकांना विशेष संवर्ग भाग २ मध्ये अर्ज भरताना १० वर्षाची सेवा झाली नाही, या कारणाखाली निलंबित केलेले आहे, जे चुकीचे आहे. अशाप्रकारे अन्य जिल्हा परिषदांकडून चुकीच्या पध्दतीने कारवाई होवू नये यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
१) जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरताना त्यांची किती वर्षाची सेवा झाली आहे. ही बाब विचारात घेणे आवश्यक नाही. या संवर्गात येणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरताना सेवेच्या कालावधीची अट लागू नाही.
२) ज्या जिल्हा परिषदांनी विशेष संवर्ग १ व विशेष संवर्ग २ मध्ये येणाऱ्या शिक्षकांवर त्यांची १० वर्षाची सेवा झाली नाही, व विशेष सवर्ग १ व विशेष संवर्ग २ मध्ये अर्ज भरलेले आहेत, म्हणून त्यांच्याविरुध्द कारवाई केलेली आहे, अशा शिक्षकांविरुध्दची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी. व त्यांची झालेली बदली रद्द केली असल्यास, त्यांना पूर्ववत त्या शाळेवर पदस्थापना द्यावी.