बदली प्राधान्य विशेष बदली पोर्टल वर प्राथमिक शिक्षकांच्या प्रोफाईल अद्ययावत करणे बाबत online teacher transfer portal
पंचायत समिती सर्व,
विषय : बदली पोर्टल वर प्राथमिक शिक्षकांच्या प्रोफाईल अद्ययावत करणे बाबत .
संदर्भ : बदली पोर्टल वरील वेळापत्रक दिनांक 01-03-2025.
वरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे .
या बदल्यांसाठी बदली पोर्टलवर शिक्षकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी करण्यासाठी बदली पोर्टल दिनांक 02-03-2025 ते 09-03-2025 या कालावधीत सुरू होणार आहे तरी आपल्या अधिनिस्त सर्व पदोन्नत मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांना आपल्या प्रोफाईल अद्ययावत करण्यास अवगत करावे व शिक्षकांनी अद्ययावत केलेल्या प्रोफाईलची त्यांच्या मूळ सेवापुस्तीका वरून पडताळणी करावी . पडताळणी झाल्यानंतर व अंतिम पुष्टी झाल्यानंतर कोणताही आक्षेप येणार नाही याची गांभीर्याने घ्यावी .
तसेच आक्षेप , अपिल, आक्षेप निकली काढणे या सर्व प्रक्रिया वरील तारखा दरम्यानच आहे.
आणि त्या तारखांचे वेळापत्रक सर्व स्तराच्या लॉगिन ला उपलब्ध आहे.
तरी बदली पोर्टलवरील वेळापत्रकानुसार विहित मुदतीत आपल्या अधिनिस्त शिक्षकांना अवगत करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी .
वरील सर्व प्रक्रियेला व विलंबास आपण सर्वस्वी जबाबदार आहात ही बाब लक्षात घेऊन योग्य नियोजन करून प्रक्रिया पूर्ण करावी .
https://ott.mahardd.com/