आंतर जिल्हा बदली शासन निर्णय दि.23 मे 2023 चा शासन निर्णय online teacher transfer gr
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलांसाठी सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक करून आत्ता जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या अध्यापनातील स्त्रिया शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणारे अडीअडचणी विचारात घेऊन 7 मे 2021 च्या शासन निर्णयान्वय शिक्षकांच्या ऑनलाईन बदलाबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार सन 2022 ची ऑनलाईन बदली प्रक्रिया या पार पाडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना निवेदने शासनास प्राप्त झाले आहेत तसेच शासन निर्णय सात मे 2019 मधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रेट याचिका माननीय उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन याचिका क्रमांक 677 2023 मध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील 13 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रांमुळे माननीय उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकी ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत शासन निर्णय दिनांक 7 मे 2021 मधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी शासन निर्णयाने अभ्यास गट नेमण्यात आला आहे सदर अभ्यास गटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतर जिल्हा बदली बाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती
उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरण बाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयामुळे खालील प्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे
1. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम १९६७ मधील 6/8 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अंतर जिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकरी आहेत
2. आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी
2.1 ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदली हवी आहे अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्यास वर्षाच्या 31 मे अखेर किमान पाच वर्षे सलग सेवा होणे आवश्यक आहे तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे या पाच वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकांच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा तीन वर्षे राहील.
2.2 मात्र आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकाचा हक्क असणार नाही.
2.4 ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली आहे अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली होईल.
2.5 आंतरजिल्हा बदली प्रकरणात ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर बंधनावरील विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाहीत अशा जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांची आंतर जिल्हा बदली साखळी पद्धतीने होईल.
2.6 यासंदर्भात आंतरजिल्हा बदली इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करताना जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील याकरिता त्यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये अर्ज करणे आवश्यक आह.
2.7 प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा online transfer बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे सदर अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्टामध्ये जोडलेला आहे या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
संबंधित शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन लोकायुक्त अन्य न्यायालय न्यायाधिकारी सक्षम प्राधिकरण यांचे स्वयं स्पष्ट आदेश असल्यास त्याच देशाची प्रत अर्ज भरताना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात यावी व त्यावर मूळ याचिकेची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात यावी.
2.8 सदरच्या बदल्या ह्यापूर्वी निश्चित केलेल्या shasan nirnay धोरणानुसार दहा टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना अंतर जिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
2.9 सदरचे आंतरजिल्हा बदली करताना संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याचा जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास त्या रिक्त पदावर बदली करण्यात येईल.
3. न्यायालयीन लोक आयुक्त अन्य प्राधिकरण सक्षम प्राधिकरण यांच्या आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवतील ज्या देशाची अंमलबजावणी झालेली आहे अशा देशाच्या प्रति शासनास पाठवू नयेत.
4. वरील प्रकरणाबाबत matter सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशांक आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीचे प्रकरणे निकाली काढण्यात येतील.
5. नवीन धोरणानुसार ना हरकत दाखवल्याची आवश्यकता नसल्याने आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखला देण्यात देण्यात येणार नाहीत.
6. आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषद मधून सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता अशा बदलीनंतर jilha parishad जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकानुसार निश्चित करण्यात येईल एकाच दिवशी एकापेक्षा अधिक शिक्षकांना सामावून घेताना त्यांची सेवा जेष्ठता त्यांच्या जन्मदिनांकानुसार करण्यात यावी.
7. संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी अंतर जिल्हा बदली स्पार अपात्र समजण्यात येईल.
8. वरील प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली करिता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील इच्छुक शिक्षकांच्या राज्यस्तरावर प्रवर्गनिहाय computer संगणकीय पद्धतीने खालील प्राधान्य प्रमाणे एकत्रित सेवा जेष्ठता सूची तयार करण्यात येईल.
8.1 ज्या शिक्षकांना दोन्ही जिल्हा परिषदांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक सदर तरतूद केवळ सन 2023 च्या आंतरजिल्हाप्रक्रियेसाठी मर्यादित राहील सन 2024 पासून नारकर प्रमाणपत्र noc प्राप्त शिक्षक हा संवर्ग आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वगळण्यात येईल.
टीप. काही जिल्हा परिषदांनी भविष्यात संबंधित बिंदू roster नामावली मधील संबंधित मेंदू वरील पद उपलब्ध होईल या अटीवर ना हरकत दाखले निर्गमित केलेले असून सदरचा शासन निर्णय बिंदू नामावलीप्रमाणे अंतर जिल्हा बदली मान्य करीत असल्याने सदर ना हरकत दाखले प्राप्त केलेले शिक्षक या प्राधान्यक्रमात बसतील.
8.2 विशेष संवर्ग शिक्षक भाग एक
या संवर्गातील संवर्गांतर्गत खालील शिक्षकांचा समावेश होईल
ख. दिव्यांग कर्मचारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक जानेवारी 2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील मानसिक विकलांग व दिव्यांग मुलाचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांची जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
ग. हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी.
घ. एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी.
च. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक
छ. कॅन्सरने कर्करोग आजाराने कर्मचारी
ज. मेंदूचा आजार झालेले कर्मचारी.
झ. थॅलेसमिया कॅन्सर विकार ग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार.
ट. माजी सैनिक तसेच आजी व माजी सैनिक व अर्थ सैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधव
ठ. विधवा कर्मचारी
ड. कुमारिका कर्मचारी
ढ. परीक्या घटस्फोटीत महिला कर्मचारी
प. वयाने 53 वर्षे पूर्ण झालेली कर्मचारी senior servent
फ. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी अथवा नातू नात स्वातंत्र्यसैनिक हायात असेपर्यंत
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी जे त्याच्या सेवाजेष्ठता प्रमाणे जेष्ठता विचारात घेण्यात येईल तसेच वरील प्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवा जेष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राथमिक प्राधान्याने विचार करण्याचा आहे अशा प्रकरणाdate of birth जन्मदिनांक देखील एकच असल्यास इंग्रजी अध्यक्ष याप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी
8.3 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2. पती-पत्नी एकत्रीकरण
जर सध्या पती व पत्नी husband wife यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत संबंधित दांपत्यांपैकी एकाने त्याचा जोडीदार ज्या जिल्ह्यात कार्यरत असेल त्या जिल्ह्यात बदली मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हा शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही याविषयी संवर्गांतर्गत अर्ज करताना दोघांनाही ते कारच असलेल्या जिल्हापेक्षा आणि जिल्ह्यात बदली हवी असल्यास पती-पत्नीची जोडी एक मिनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्या जोडी दोघांपैकी जे सेवा जेष्ठ असणाऱ्या जोडीदाराची सेवा जेष्ठता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची सेवा जेष्ठता ग्राह्य धरण्यात येईल व दोघे कार्यरत असलेल्या जिल्हा पेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात त्यांचे निवड प्रवर्गानुसार बिंदू रिक्त असल्यास प्राधान्य मिळेल पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत असणारी वर्गवारी खालील प्रमाणे आहे तथापि एखादा जिल्ह्यामध्ये पती-पत्नी एकत्र करणं अंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्ह्यातील प्राधान्यक्रम सेवाजेष्ठता विचारात घेऊन ठरविण्यात येईल.
क. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.
ख. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर.
ग. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर
घ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका किंवा नगरपालिक.
च. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.
छ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल तर.
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाजेष्ठतेप्रमाणे जेष्ठता विचारात घेण्यात येईल तसेच वरील प्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवा जेष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावयाचा आहे अशा प्रकरणात जन्मदिनांक ही एक असल्यास इंग्रजी अध्यक्षाराप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.
त्यानंतर सर्वसाधारण अर्जदारांची आंतरजिल्हा बदलीसाठी जेष्ठता त्यांच्या शिवाय जेष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येईल वरील प्रमाणे जेष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवा जेष्ठता विचारात घेण्यात येईल सेवा जेष्ठता दिनांक एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी अध्यक्ष याप्रमाणे आडनाव विचारात घेत घेऊन ज्या अध्यक्ष प्रथम येते त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्यात येईल.
9. उपरोक्त नमू नमूद मुद्दा क्रमांक आठ प्रमाणे एकत्रित संवर्ग न्याय जेष्ठता सूची तयार झाल्यानंतर अंता जिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणाली द्वारे संवर्गनिहाय जेष्ठतानुसार व विनंती प्रमाणे करण्यात येईल ज्या शिक्षकांची बदली करावयाची आहे त्या शिक्षकाची बदली ज्या जिल्ह्यात होणे अपेक्षित आहे त्या जिल्ह्यात त्या प्रवर्गासाठी बदली वर्षांमध्ये 31 मे अखेर बिंदू नामावली मधील सरळ सेवेचे पद रिक्त असणे आवश्यक आहे त्याच पदावर संबंधितांची बदली केली जाईल कर्मचाऱ्यांनी त्याच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्ह्यात बिंदू नामावली प्रमाणे थेटपणे व सकृत दर्शनी पद उपलब्ध नसल्यास बदलांकरिता साखळी पद्धतीचा अवलंब करण्यात येईल व त्याद्वारे मागणी केलेल्या जिल्ह्यात पद उपलब्ध झाल्यास त्या पदावर संबंधित शिक्षकाची आंतरजिल्हा बदली केली जाईल.
10. आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे यासाठी कोणतेही भत्ते व पर्यावरण अवधी कर्मचाऱ्यास आणून होणार नाही.
11. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली या शासन निर्णयातील तरतुदीमुळे बाधा पोहोचणार नाही.
12. आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकांनी हजर झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
13. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषद यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
13.1 दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्तीच्या दिनांकानुसार सर्वप्रथम जेष्ठता यादी तयार करण्यात याव्यात.
13.2 यानंतर या यादीतील इच्छुक असलेल्या शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात नेमणूक देण्यात यावी इच्छुक नसल्यास कनिष्ठतम शिक्षकांना त्या भागात नेमणूक देण्यात यावी कोणत्याही परिस्थितीत आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सर्व जागा भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
13.3 त्यानंतर वरील जेष्ठता यादीतील इच्छुक शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती नियुक्ती देण्यात यावी कोणीही इच्छुक नसल्यास व इच्छुकांची संख्या कमी असल्यास सेवा जेष्ठता यादीनुसार कनिष्ठ शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जागी नेमणूक देण्यात यावी.
14.4 वरील प्रमाणे रिक्त जागा संपूर्णतः भरल्यानंतर जिल्ह्यातील ज्या तालुक्यातील जागांची टक्केवारी सर्वाधिक आहे अशा तालुक्यातील वित्त जागा भरण्यात यावेत हे करताना इच्छुक शिक्षकांना त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी व उरलेल्या रिक्त जागांवर नियुक्तीसाठी स्वैच्छणे कोणी मागणी करीत नसल्यास अशा जागांवर समुपदेशनाने नेमणूक करण्यात याव्यात.
13.5 अशाप्रकारे क्रमाने रिक्त जागांची अधिक पासून कमी टक्केवारी असणाऱ्या तालुक्यातील जागा भरण्यात येतील.
13.6 जिल्हा परिषदेमध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांची आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जेष्ठता यादी तयार करून दर मंगळवारी उपलब्ध रिक्त जागांवर त्यांची समुपदेशनाने पदस्थापना देण्यात यावी
14. Inter district transfer आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषद यांनी उपरोक्त मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यापूर्वी विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत ची कार्यवाही करावी.
14.1 विशेष संवर्ग भाग एक या संवर्गातील शिक्षकांना सर्वप्रथम प्राधान्यांनी समायोजनाने प्रस्थापना देण्यात यावी अशी पदस्थापना देताना पूर्ण जिल्ह्यात ज्या ठिकाणी भरलेले नियुक्ती देण्यात येते जागा असतील त्या रिक्त जागेवर त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात यावी म्हणजेच यासम वर्गाला पदस्थापना देताना मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद भरती करण्यात येणारे पदाचा प्राधान्यक्रम विचारात घेऊ नये.
14.2 विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष संवर्ग भाग दोन या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कारवाई करावी अशी कार्यवाही करताना आंतरजिल्हा बदलीने संबंधित जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीच्या जोडीदार त्या जिल्ह्यात कार्यरत असल्यास अशा अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना उपरोक्त मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद सूचनेनुसार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे अशा जागी त्यांना नियुक्ती द्यावी या नियुक्तीने समाधी शिक्षणाला त्याच्या जोडीदारापासून 30 किमी परिसरात नियुक्ती मिळत नसल्यास संबंधित शिक्षक व त्या जोडीदार जी पर्याय प्राधान्याने भरणे आवश्यक आहे अशा पदावरून दोघांना नियुक्ती द्यावी.
14.3 विशेष संवर्ग भाग दोन या संवर्गातून अंतर जिल्हा बदलीने संबंधित जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीच्या जोडीदार त्या जिल्ह्यात कार्यरत नसल्यास अशा जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष संवर्ग भाग दोन या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.
15. जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलांबा सुधारित धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांची त्यांच्या पसंतीनुसार दिलेल्या जिल्ह्यात जरी अंतर जिल्हा बदली झाली तरी त्यांनी सदर जिल्ह्यातील बदली रद्द करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द करण्यास परवानगी देण्यात येते यासंदर्भात खालील प्रमाणे धोरण निश्चित करण्यात येत आहे.
15.1 आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यात रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात यावा व सदर कालावधीत बदली आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
15.2 आंतरजिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षक असतील बदली नको असल्यास ती बदली रद्द करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या आत बदली रद्द करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक राहील एक महिन्यानंतर अशी बदली रद्द करता येणार नाही.
15.3 बदली रद्द करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेताना त्या जिल्हा परिषदेमध्ये त्या संवर्गाची जागा रिक्त असल्याची खातर जमा करावी अशा प्रकारे संवर्गाची जागा रिक्त नसल्यास बदली रद्द करता येणार नाही.
15.4 आंतरजिल्हा बदली रद्द करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचाच असेल.
15.5 आंतरजिल्हा बदली आदेश रद्द करणे हा संबंधित शिक्षकाचा हक्क नाही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचा निर्णय अंतिम असेल व त्या निर्णयाच्या विरुद्ध विभागीय आयुक्त अथवा शासनाकडे अपील विनंती करता येणार नाही.
15.6 अशा शिक्षकांना नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या निवडीच्या प्रवर्गाची जागा रिक्त असल्यास त्याची मूळ जिल्हा परिषदेत नियुक्ती कायम ठेवण्यात येईल परंतु यापुढे आंतरजिल्हा बदलीने झालेली बदली रद्द करून त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत जाण्याची विनंती करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या संवर्गातील सेवाजेष्ठता गमवावी लागेल आंतरजिल्हा बदली रद्द करून जे शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेत जातील अशा शिक्षकांची त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये फेरनियुक्ती गृहीत धरून त्यांना सेवाजेष्ठता मध्ये सर्वात कनिष्ठ जागी दर्शविण्यात येईल.
15.7 जे शिक्षक आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर सदर बदली रद्द करतील त्या शिक्षकांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीत आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
16. पहिल्या अंतर जिल्हा बदलीस पाच वर्षाचा कालावधी झाल्यानंतर दुसऱ्या नंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल
18. अंतर जिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्राच्या सत्याची बाबत काही तक्रारी असल्यास अशा प्रकारची मुख्य कार्यकारी अधिकारी शहानिशा करून निर्णय देण्यात यावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल.
19. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात संबंधित विभागीय आयुक्तांनी तक्रार प्राप्त झाल्यास प्रकरण परत्वे तक्रारींची शहानिशा करून तीच दिवसात निर्णय घ्यावा विभागीय आयुक्त यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक वीस तेवीस झिरो पाच202305 23 13 ४३१८८४२० असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
23 मे 2023 चा आंतर जिल्हा बदली GR येथे पहा
Click here 👉PDF download
शासन निर्णय 👆