जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रकानुसार करावयाची कार्यवाही बाबत online teacher transfer
संदर्भ :- 1. ग्राम विकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक जिपब-2023/प्र.क्र.118 /आस्था-14 दि. 18 जून, 2024
2. मा. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. न्यायाप्र-2024 /प्र.क्र. 105/आस्था-14 दि. 07 नोव्हेंबर, 2024
उपरोक्त विषय व संदर्भीय क्र. 01 नुसार जिल्हा परिषद, अंतर्गत प्राथ. शिक्षक संवर्गाचे जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारीत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार शासनाने यापुर्वी वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टल व्दारे राबविण्यात येते.
मा. उच्च न्यायालय, नागपुर येथे दाखल अवमान याचिका क्र. 216/2024 वरील दिनांक 25/10/2024 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपुर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले
आहेत.
त्याअनुषंगाने नियमित जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया
पुर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर शासनाने संदर्भीय क्र. 02 अन्वये ठरवून दिलेल्या वेळापत्राकानुसार ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया
गटस्तरावर सुरु करावी व जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया पार पाडत असतांना शासन नियमांचे काटेकोरपणे पालन होऊन कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी. तसेच, संदर्भिय शासन परिपत्रक शासन निर्णय व वेळापत्रक आपले स्तरावरून सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणण्याची जबाबदारी आपली आहे,
आपले अधिनस्त प्राथमिक शिक्षकांकडुन अनावधानाने चुकीची माहिती भरली गेल्यास संबंधिताच्या वेळीच निदर्शनास आणून सदर बाब दुरुस्ती करावी. तसेच, एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरुन शासनाची दिशाभुल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करणेत येईल याबाबतही सर्व शिक्षकांना अवगत करणेत यावे.
उपरोक्त संदर्भीय पत्रात दिलेले वेळापत्राकनूसार विहित कालावधीत मध्ये उचित कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.
सोबत : संदर्भ क्र. 02 चे शासन पत्र व वेळापत्रक