शिक्षक बदल्यांना नवीन वर्षात मुहूर्त ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविली जाणार बदल्यांची प्रक्रिया online teacher transfer
ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविली जाणार बदल्यांची प्रक्रिया
नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश आहेत. बदली प्रक्रियेचे एकूण ६
उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार राबविण्यात यावे, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची तयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र
टप्पे निश्चित जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेदरम्यान ६ टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसारच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संपूर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक असे…
*१ जानेवारी ते २८
फेब्रुवारीदरम्यान आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, बदलीपात्र व
बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्यांवरील आक्षेपावर निर्णय घेणे. शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.
*१ ते ३१ मार्च :
समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे
याबाबतची माहिती निश्चित करणे. *१ ते २० एप्रिल: बदलीसाठी आवश्यक डाटा तयार करून विन्सीस कंपनीला उपलब्ध करून देणे.
*१२ ते २७ एप्रिल बदली प्रक्रियेच्या पहिल्या टप्यात समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित
करण्यात येतील.
*२८ एप्रिल ते ३ मे टप्पा क्रमांक २ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक
भाग १ दरम्यान शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे.
३४ ते ९ मे टप्पा क्रमांक ३ मध्ये विशेष संवर्ग शिक्षकांच्या जागा भरणे.
*१० ते १५ मे टप्पा क्रमांक ४ मध्ये बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या.
१६ ते २१ मे टप्पा क्रमांक ५ मध्ये बदलीस पात्र शिक्षकांसाठी प्रक्रिया. २२ ते २७ मे टप्पा क्रमांक ६ मध्ये विस्थापित शिक्षकांसाठी प्रक्रिया.
२८ मे नंतर टप्पा क्रमांक ७ मध्ये अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे.